Udgir Corona Updates, Latur 
मराठवाडा

Breaking News : उदगीरात आणखी दोघांना कोरोनाची लागण

हरि तुगावकर

लातूर ः उदगीर येथील सहा कोरोना बाधित रुग्णे बरे होवून त्यांना पुष्पगुच्छ देवून निरोप देवून काही तासच उलटत नाहीत तोच आणखी दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी (ता.15) समोर आले आहे. उदगीरमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे रुग्ण चांगले होत आहेत.

शुक्रवारी उदगीरमधील सहा रुग्णांनी कोरोनावर मात करून बरे झाले. त्यांना राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देवून निरोपही देण्यात आला. या कार्यक्रमाला काही तासच उलटत नाहीत तोच आणखी दोघांना लागण झाली आहे.
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज उदगीर येथून आठ व्यक्तीचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. या पैकी सहा जण निगेटीव्ह आले आहेत. तर दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

उदगीर येथील नांदेड नाका भागातील हे रहिवाशी आहेत. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकूण 61 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 13 पैकी 13 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. किल्लारी येथील 3 पैकी 3, चाकूरमधील एक व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आहेत. बीड येथील 17 पैकी 17 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत व उस्मानाबाद येथील 19 पैकी 18 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असून एका व्यक्तींचा अहवाल प्रलंबित आहे, अशी माहिती विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकूर यांनी दिली

कोरोना मिटर

एकूण बाधित रुग्ण---39
उपचार सुरु असलेले रुग्ण--9
बरे झालेले रुग्ण--29
मृत्यू---1

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

नवी मुंबईत गॅस वितरण ठप्प, 1500हून अधिक कमर्शियल सिलिंडर पुरवठा बंद; हॉटेल व्यावसायिक अडचणीत

IPL 2026 Marathi News : राजस्थान रॉयल्सची साथ सोडली कारण... ! संजू सॅमसननं मन मोकळं केलं; म्हणाला, त्यांच्याविरुद्ध खेळताना भावना...

SCROLL FOR NEXT