Crime News :  esakal
मराठवाडा

Crime News : धाराशिवमध्ये लाच घेताना दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक

सापळा पथकात पोलीस अंमलदार सचिन शेवाळे, विष्णू बेळे, नागेश शेरकर यांचा समावेश होता

दीपक बारकुल

मराठवाडा : धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत पंधरा हजार रुपयांची लाच घेताना दोन पोलीस कर्मचारी यांना अटक केली आहे.येरमाळा पोलीस ठाण्यात दाखल एका प्रकरणात ट्रॅक्टर सोडण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. प्रकाश नामदेव चाफेकर, पोलीस हवालदार येरमाळा पोलीस ठाणे व महेश जालिंदर सांगळे, चालक, पोलीस नाईक उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तुळजापूर अशी आरोपींची नावे आहेत त्यांनी पंधरा हजार लाचेची मागणी केली व पंधरा हजार लाच घेताना रंगेहात अटक केली.

यातील तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे असलेला ट्रॅक्टर येरमाळा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यामध्ये जप्त असल्याने सदर ट्रॅक्टर सोडण्यासाठी चाफेकर यांनी सांगळे मार्फतीने तक्रारदार यांचेकडे पंधरा हजार लाचेची मागणी करून पंधरा हजार लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारल्याने सांगळे यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथे

गुन्हादाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक विकास राठोड यांनी काम पाहिले त्यांना सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. सापळा पथकात पोलीस अंमलदार सचिन शेवाळे, विष्णू बेळे, नागेश शेरकर यांचा समावेश होता. लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर कार्यालय ०२४७२ २२२८७९ व टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT