मराठवाडा

अपघातात दोन गंभीर जखमी, कार पलटी; दुचाकी जळून खाक

दीपक सोळुंके

भोकरदन (जालना) : भोकरदन हसनाबाद मुख्य रस्त्यावर रविवारी (ता.24) दुपारी एक वाजेच्या सुमारास दुचाकी व कारमध्ये झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले.

अरुण अण्णा सोनोने (वय 29) व कोंडीबा भिमराव ठाले (वय 28) दोघे राहणार वाडी बुद्रुक ता. भोकरदन असे जखमींची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार अरुण व कोंडीबा दोघे दुचाकीने हसनाबाद मार्गे औरंगाबाद येथे कामानिमित्त जात होते. त्यादरम्यान हसनाबादहुन भोकरदनकडे येणारी कार व त्यांच्या दुचाकीत कुंभारी पाटीजवळ सामोरा समोर जोराची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कार पलटी : दुचाकी खाक..
दरम्यान अपघातानंतर कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली तर दुचाकी आग लागल्याने दुचाकीचा पूर्णपणे कोळसा झाला. कारमधील कोणी जखमी आहे का याबाबत माहिती मिळू शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT