मुग sakal
मराठवाडा

मुगाला हमीभावापेक्षा दोन हजार रुपये कमी दर

हिरवागार,चमकदार मूग असतानाही हमीभावा पेक्षा दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दिलीप गंभीरे

कळंब (जि.उस्मानाबाद) : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या नव्या मुगाची आवक सुरू झाली असून हिरवागार,चमकदार मूग असतानाही हमीभावा पेक्षा दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यामधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.या शेतमालास शासनाने ७ हजार २७५ रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केलेला असतानाही बाजार समितीमध्ये मात्र अधिकाधिक ६ हजार ५०० ते ५ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात येत आहे.चांगल्या प्रतीचा मूग असतानाही दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.

तालुक्यात प्राथमिक अंदाजानुसार २ हजार हेक्टर क्षेत्रावर मुगाची पेरणी झाल्याचा अंदाज असून खरीप हंगामातील कमी कालावधीचे पीक असलेले मुग आणि उडीदाची काढणी सुरू आहे.मुगाची काढणी झाली असून उडीदाची सुरू आहे.यावर्षी तालुक्यात सर्वदूर आणि मोठा असा पाऊस झाला नाही.मुगाची काढणी भरडणीच्या वेळी पाऊसाने खंड दिला.त्यामुळे या शेतमालाची आवक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू झाली असून सोमवार (ता.३०) येथील बाजार समितीमध्ये २५१ क्विंटल मुगाची आवक झाली आहे.पावसाच्या अनियमिततेमूळे मुगाच्या उत्पन्नात घट निर्माण झाली आहे.त्यामुळे उत्पन्नात शेतकरी समाधानी नाहीत.त्यातच हमीभावापेक्षा आडत बाजारात मूग या शेतमालाला अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात आहेत.उत्पन्नात कमालीची घट आलेली असतानाही बाजारात कवडीमोल दराने खरेदी होत आहे. नैसर्गिक आपत्तीने पिचून गेलेल्या शेतकऱ्यांना आडत बाजारात मिळत असलेल्या अल्प दरामुळे या पिकावर केलेला खर्चही वसूल होणे कठीण आहे. शासनाने बाजार समितीवर नियंत्रण ठेवून शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीदर देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

चांगल्या प्रतीच्या मुगालाही दर कमीच;

आडत बाजारात मुगाला हमीभावापेक्षा ही कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात असून आडत बाजारात मुग विक्री करण्याचा उद्देश असल्याने शेतकरी चाळून गाळून मूग विक्री करण्यास आणण्यात येतो. यावर्षी पिकावर कसल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही किंबहुना शेतकऱयांनी तो होऊ दिला नाही.त्यामुळे मुग हा शेतमाल हिरवा गार व चमकदार असल्याचे दिसून येते.चांगल्या प्रतीचा शेतमाल असतानाही हमीदरापेक्षा दर कमी मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT