Accident Sakal
मराठवाडा

वरुड तांडा शिवारात दोन दुचाकीचा अपघात, एक जण जागीच ठार

आखाडा बाळापूर ते नांदेड मार्गावर घटना घडली

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली - आखाडा बाळापूर ते नांदेड मार्गावर वरुड तांडा शिवारात दोन दुचाकीच्या धडकेत एक जण जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी ता. २१ पहाटे घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथील सतीश नरवाडे वय २२ हा युवक त्याच्या दुचाकी वाहनावर शुक्रवारी ता. वीस नांदेड येथे गेला होता. त्यानंतर काम आटोपून तो परत जवळा पांचाळ येथे निघाला होता. तो वरुडतांडा शिवारात आल्यावर एका दुचाकी वाहनाने सतीशच्या दुचाकीला धडक दिली या अपघातात सतीश गंभीर जखमी होऊन अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान शनिवारी पहाटे पाच वाजता ही घटना आखाडा बाळापुर पोलिसांना कळाल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड , उपनिरीक्षक शिवाजी बोंडले , जमादार शेख बाबर , प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी मयत सतीश नरवाडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor Martyrs: देशासाठी प्राणार्पण... ऑपरेशन सिंदूरमधील 'त्या' सहा शूरवीरांची ओळख अखेर उघड

IND vs IRE: वैभव सूर्यवंशीच्या 'नो-लुक' शॉटची चर्चा;नेट्समध्ये ठोकले तुफानी षटकार, BCCI ने शेअर केला VIDEO

Latest Marathi News Live Update : वाशिममध्ये बसस्थानकावर भरदिवसा चोरीचा प्रयत्न; दोन महिला रंगेहाथ पकडल्या

Rajapur Nuclear Power Project : 'आता प्रकल्पाला विरोध कराच, समोरून काय करतो ते बघाच..'; खासदार नारायण राणेंचा अणुऊर्जा प्रकल्पावरून विरोधकांना थेट दम

Maharashtra Dahi Handi: गोविंदांसाठी खुशखबर! सरावादरम्यानही मिळणार १० लाखांचे संरक्षण, २ लाखांपर्यंत उपचार खर्च, विशेष विमा कवच लागू

SCROLL FOR NEXT