Two young boys die because of submerging under sand in Jalna 
मराठवाडा

वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून दोन तरुणांचा मृत्यू

दीपक सोळुंके

भोकरदन (जि. जालना) : नदीपात्रातील वाळू ट्रॅक्टरमध्ये भरत असतांना अचानक वाळूचे ढिगार कोसळल्याने ढिगाऱ्याखाली येऊन दोन तरुणांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. ही शनिवारी (ता. 23) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील गोकुळ शिवारात घडली. 

योगेश कोंडीबा तराळ (वय 18) व अनिकेत विक्रम तराळ (वय 17) दोघेही (रा. गोकुळ, ता. भोकरदन) अशी या घटनेत मृत झालेल्या तरुणांची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश व अनिकेत हे दोघे गावाजवळील केळणा नदी पात्रामध्ये रात्रीच्या वेळी वाळूचे ट्रॅक्टर भरत असतांना वाळूचा ढिगारा अचानक खचल्याने वरील दोन्ही तरुण या ढिगाऱ्याखाली दबल्या गेले. या घटनेनंतर येथे असलेल्या अन्य दोघांना ते दबल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गावाकडे धाव घेऊन ग्रामस्थांना बोलावले. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्याने गावकऱ्यांनी नदी पात्राकडे धाव घेत त्यांचा शोध घेत त्यांना ढिगाऱ्याखालून काढून तत्काळ भोकरदन ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र, येथे पोहचण्यापुर्वीच त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून, रविवारी सकाळी दोघांवरही एकाचवेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान या घटनेत मयत झालेला अनिकेतने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती तर योगेश हा अकरावीत शिकत होता. या कोवळ्या वयात त्यांचा असा दुर्दैवी मृत्यू ओढवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

Paithan Crime: पाचोडजवळ टोलवर राडा! वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला; आठ संशयित ताब्यात

Swing Accident: अभ्यासात हुशार, वडिलांच्या दुकानात मदतीचा हात; झोक्याच्या दुर्घटनेत ११ वर्षीय प्रथमेशचा मृत्यू

Lonavala Tourism: पाऊस पडतोय अन् मावळ सजतोय! धबधबे, घाट, किल्ले अन् धरणांचे सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Sugar Stock Limit: मिठाई विक्रेत्यांनो लक्ष द्या! साखर साठवणुकीचा नवा नियम, अतिरिक्त साठा ठेवल्यास कारवाई होणार, मर्यादा किती?

SCROLL FOR NEXT