Two young farmers died due to lightning in Chachur taluka of Latur district
मराठवाडा

Latur Rain Update : लातूरच्या चाकूरमध्ये अवकाळीचा तडाखा! वीज पडून दोन तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू

महाळंगी (ता.चाकूर) येथे रविवारी (ता.२६) दुपारी चारच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये विज पडून दोन तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे

प्रशांत शेटे

चाकूर, ता. २६ (बातमीदार) ः महाळंगी (ता.चाकूर) येथे रविवारी (ता.२६) दुपारी चारच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये विज पडून दोन तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तसेच झाडे उन्मळून घरावर व वाहनांवर पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

महाळंगी परिसरात रविवारी दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला, यावेळी शेतात थांबलेल्या असलेल्या शिवाजी नारायण गोमचाळे (वय ३५) व ओमकार लक्ष्मण शिंदे (वय ३०) यांच्या अंगावर विज पडल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यु झाला. याची माहिती मिळताच तहसीलदार नरसिंग जाधव, मंडळ अधिकारी अनुपमा निंबाळकर, तलाठी विष्णु वजिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

जानवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आले आहेत. यासोबतच गावात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत यात एकाच्या घरावर झाड पडल्यामुळे घराची पडझड झाली आहे तर दुसरे झाड एका अॅटोवर पडल्यामुळे त्यांचेही नुकसान झाले आहे. जोराच्या वाऱ्यामुळे विद्युत खांबही पडल्यामुळे गावातील विजपुरवठा खंडीत झाला आहे. शिवणखेड येथे वादळी वाऱ्यामुळे प्रभू रामा कोंपले या शेतकऱ्यांच्या शेतातील म्हशीवर बाभळीचे झाड पडल्यामुळे म्हशीचा मृत्यु झाला आहे. झरी खुर्द येथील गणेश सुर्यवंशी या शेतकऱ्यांच्या शेतातील दोन एकर क्षेत्रावरील केळीची बाग उध्वस्थ झाली आहे यात शेतकऱ्यांचे लाखों रूपयाचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मयत ओंकार शिंदे यास चार मुली

महाळंगी येथे विज पडून मयत झालेल्या ओंकार शिंदे या शेतकऱ्यांला चार मुली आहेत तसेच दुसरा मयत शिवाजी गोमचाळे यास एक मुलगा, पत्नीआई - वडील असा परिवार आहे. दोघांच्या मृत्युमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विजाच्या कडकडाच्या वेळी शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

महाळंगी येथे दोन तरूण शेतकऱ्यांचा मृत्यु झाल्यानंतर आमदार बाबासाहेब पाटील यांनी श्रध्दांजली अर्पण केली असून सध्या सर्वत्र अवकाळी पावसाची स्थिती असल्यामुळे विजेच्या कडकडात होत असताना झाडाखाली थांबू नये, जनावरांना सुरक्षित ठिकाणी आसरा द्यावा, शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT