two youth death in accident three injured Osmanabad  sakal
मराठवाडा

दुचाकीची समोरासमोर धडक: २ युवकांचा जागीच मृत्यू तर ३ गंभीर

लोहारा-पाटोदा मार्गावरील मार्डी गावाजवळ झाला अपघात

नीळकंठ कांबळे

लोहारा (जि. उस्मानाबाद) : दोन दुचाकीची समोरासमोर जोराची धडक लागल्याने दोन युवकांचा जागेवर मृत्यू झाला. तर तीघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरूवारी (ता. सात) दुपारी साडेतीनच्या सुमारास लोहारा-पाटोदा मार्गावरील मार्डी गावाजवळ घडली. तालुक्यातील कानेगाव येथील मनमोहन उर्फ नाना सुभाष कदम (वय ३०), रविकांत ज्ञानदेव कदम (वय ३५) दोघे दुचाकीवरून मार्डीकडे जात होते. तर मार्डीहून लोहाऱ्याकडे धीरज महादेव आनंदगावकर (वय २६), नितिन व्यंकट कोळी (वय २६ दोघे रा. भातागळी), आकाश भोसले (वय २१ रा.मातोळा ता.औसा) तिघेजण दुचाकीवरून येत होते.

दरम्यान, मार्डीपासून एक किलोमीटर अंतराव दोन्ही दुचाकीची समोरासमोर जाोराची धडक झाली. यात नाना कदम, धीरज आनंदगावकर या दोघे जागीच ठार झाले. तर रविकांत कदम,नितिन कोळी, आकाश भोसले हे तीघेजण गंभीर जखमी झाले. जखमींना लोहारा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मार्डी येथे एकाची कंदुरीचा कार्यक्रम होता. कानेगावचे युवक कंदुरीचे जेवण करून परतत होते. तर भातागळीचे युवक कंदुरीच्या जेवणासाठी मार्डीकडे निघाले होते. दोन्ही दुचाकी भरधाव असल्याने भीषण अपघात झाला. दोन्ही दुचाकीची पुढील चाके तुटली होती. घटनेची माहिती मिळताच साहयक पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, पोलिस हवलदार आनिल बोदमवाड, किशोर शेवाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Helicopter News : नादच पुरा केला ! कोल्हापूरच्या पठ्ठ्याने हेलिकॉप्टर विकत घेतलं, सांगलीत सासऱ्याला दाखवायला गेल्यावर जावयाचं केलं असं स्वागत...

कफ सिरपमध्ये ब्रेक ऑइलचं विषारी केमिकल, किडनी निकामी होऊन १४ मुलांचा मृत्यू; औषधावर घातली बंदी

Latest Marathi News Live Update: भरदिवसा व्यावसायिकाच्या गाडीची डिकी तोडून 2.85 लाख लंपास

Kolhapur Cricket : कोल्हापुरच्या पोरी महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाच करणार नेतृत्व, टी-२० च्या कर्णधारपदी अनुजा पाटील

SCROLL FOR NEXT