udgir 8 people were arrested after raiding kuntankhana 6 people were charged two women reformatory
udgir 8 people were arrested after raiding kuntankhana 6 people were charged two women reformatory Sakal
मराठवाडा

Latur News : उदगीरात कुंटणखाण्यावर धाड टाकून ८ जणांना पकडले ६ जणांवर गुन्हा; दोन पिढीतेची महिला सुधारगृहात रवानगी

युवराज धोतरे

उदगीर, (जि.लातुर) : शहरातील नाईक चौकातील उच्चभ्रु वस्तीतील एका कुंटणखान्यावर गुरुवारी (ता.१५) सायंकाळी ग्रामीण पोलिसांनी धाड टाकून आठ जणांना पकडले आहे. यातील दोन पिडीतेची लातूरच्या महिला सुधारगृहात रवांनगी केली असून सहा जणांवर अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत ग्रामीण पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवारी सायंकाळी नाईक चौकातील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती ग्रामीण पोलीस निरीक्षकांना मिळाल.त्यांनी सापळा रचून सदर वस्तीतील पोतदार यांच्या घरात सुरू असलेल्या कुंटण खाण्यावर धाड टाकली. त्यावेळेस त्यांना चार महिला, तीन ग्राहक पुरुष व घरमालक कुंटणखाना चालवत असल्याचे दिसून आल्याने रंगेहात पकडले.

याची सखोल चौकशी केली असता या चार महिलांपैकी दोन महिलांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेत देह विक्रीसाठी प्रवृत करण्यात आल्याचे समोर आले. या पिढीत महिलांचा जवाब घेतल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकत्ते यांच्या फिर्यादीवरुन कुंठणखाना चालवणाऱ्या दोन महिला,

घरमालक व तीन ग्राहकांवर देह व्यापार प्रतिबंध अधिनियमानुसार ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री एक वाजता आरोपी उच्चभ्रु घरच्या दोन महिला व शंकर काशिनाथ कुंभारगीरे, सुनील युवराज चांडेश्वरे, राजकुमार प्रकाश कुंभारगीरे (सर्व राहणार कमालनगर कर्नाटक) व घरमालक श्रीनिवास रमेश पोतदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील दोन पिढीत महिलांना रात्री एक वाजता येथील प्रथम वर्ग न्यायदिंडाधिकार्‍यांसमोर हजर केले असता त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना लातूरच्या महिला सुधारगृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले. बाकी आठ आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर हळहळलं! खरेदीसाठी गेल्या जवानांवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोंघाचा मृत्यू; ऑटोचालकासह सहा जवान गंभीर जखमी

Shikhar Dhawan: लेकाच्या विरहानं शिखर व्याकुळ; फादर्स डेच्या शुभेच्छा देताना म्हणाला, 'त्याच्याशी बोललो नाहीये...'

Jerusalem : दिवसाउजेडी हल्ले थांबवणार; गाझातील मदतकार्याच्या सोयीसाठी इस्राईलकडून घोषणा

Russia-Ukraine Conflict : ‘युक्रेन’बाबत स्वित्झर्लंडमध्ये बैठक; रशियाच्या अनुपस्थितीने तोडग्याची शक्यता कमीच

Prataprao Chikhlikar: मनोज जरांगेंची हवा नांदेडपर्यंत...! प्रतापराव चिखलीकरांचा गेम कसा झाला?

SCROLL FOR NEXT