जनावर बाजार.jpg
जनावर बाजार.jpg 
मराठवाडा

संसर्ग रोखण्यासाठी सतर्कता, उदगीरचा जनावर बाजार बंद!

युवराज धोतरे

उदगीर (लातूर) : सध्या सर्वत्र जनावरांमध्ये लागण होत असलेला लंपी स्कीन डिसेस या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्था जिल्हा निबंधकाने जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना आदेश काढून जनावराचा बाजार पुढील आदेश येईपर्यंत पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देशित केले आहे.

सध्या सगळीकडे कोरोना संसर्गाचे सावट असताना दुसरीकडे जनावरात लंपी स्कीन या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसह प्रशासनही अलर्ट झाले आहे. या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अद्याप कुठलीही लस उपलब्ध झाले नसून रोग होऊ न देणे हा एकमेव पर्याय सध्या उपलब्ध असल्याने संसर्गजन्य परिस्थिती टाळण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

उदगीर शहर तीन राज्याच्या सीमेवर असल्याने येथे जनावरांचा दर गुरुवारी मोठ्या प्रमाणावर बाजार भरतो.शेतकरी आपली जनावरे घेऊन येतात. मोठ्या प्रमाणावर जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार या बाजारात होत असतात. त्यामुळे आता हा बाजार बंद करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होणार आहे.


सध्या म्हशीच्या खरेदी-विक्रीचे सिझन सुरू असल्याने या व्यवसायास फटका बसण्याची शक्यता आहे. अगोदरच अतिवृष्टीमुळे संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपले जनावरे विकायची कोठे? हा मोठा प्रश्न पडला आहे.

गाई म्हशी पाठोपाठ उदगीर शहरात भरवण्यात येणाऱ्या शेळीच्या बाजारावरही गधा आली आहे. मोठ्या प्रमाणावर होणारे खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाल्याने आर्थिक उलाढाल मंदावणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्वांना बाजार बंद असल्याने आपली जनावरे विक्रीसाठी बाजारात आणू नये असे आवाहन केले आहे.

पर्यायी व्यवस्था करायला हवी
सध्या म्हशीच्या खरेदी-विक्रीचे सिझन असल्याने जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक बनले आहे.बाजार समितीच्या पुढाकारातून सर्व पशूंना एकत्रित येऊ न देता ऑनलाइन पद्धतीने खरेदी विक्रीची पर्यायी व्यवस्था उभारल्यास पशुपालकांची गैरसोय होणार नाही.

(Edited By Pratap Awachar)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Paneer Stuffed Chilla: विकेंडला बनवा पनीर स्टफ चिला, नोट करा रेसिपी

Sakal Podcast : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं नंदुरबार यंदा कोण जिंकणार? ते देशासमोर पाण्याचे संकट

SCROLL FOR NEXT