बसवराज पाटील Sakal
मराठवाडा

उमरगा : महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन

कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांची केंद्र सरकारवर टिका.

सकाळ वृत्तसेवा

उमरगा : उमरगा - लोहारा तालुका काँग्रेस समितीच्या वतीने इंधन दर वाढ आणि महागाई निषेधार्थ, केंद्र सरकारच्या विरोधात शुक्रवारी राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेस समिती कार्यालयासमोर प्रदेश कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन करण्यात आले. दरम्यान टाळ मृदंग, हलगीच्या निनादात आडवी दुचाकी आणि गॅस सिलेंडरला पुष्पहार घालुन अनोखे आंदोलन करण्यात आले.

संपूर्ण देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल, डिझेलची दरवाढ केंद्र सरकारच्या कृपेने झालेली आहे. महागाई कमी करण्यासाठी कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. गॅस सिलेंडरचे दर वरचेवर वाढत असल्याने गृहिणींच्या किचनचे अर्थ गणितच बिघडले आहे. महागाईने सर्वसामान्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

या वेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, काँग्रेसचे प्रदेश सचिव दिलीप भालेराव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, तालुकाध्यक्ष अँड. सुभाष राजोळे, युवक काँग्रेसचे विजय वाघमारे, एम. ओ. पाटील, विजय दळगडे, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष संगिता कडगंचे, युवक काँग्रेसच्या सचिव तन्नय्या कडगंचे, संगीता पाटील, सुवर्णा भालेराव, प्रेमलता टोपगे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, विजयकुमार सोनवणे, विठ्ठलराव बदोले, नानाराव भोसले, विठ्ठलराव पाटील, मदन पाटील, गोविंद पाटील, महालिंग बाबशेट्टी, विक्रम मस्के, योगेश राठोड, अनिल उर्फ पप्पू सगर, सचिन पाटील, रफीक तांबोळी, नगरसेवक दिपक मुळे, ॲड. विरसंगप्पा आळंगे, धनराज हिरमुखे, रशीद शेख, याकुब लदाफ, हरी लोखंडे, विक्रम मस्के, महेश माशाळकर, बनसोडे, शिवाजी गायकवाड, सोहेल इनामदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

" इंधनाची झालेली प्रचंड दरवाढ आणि महागाईने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसतो आहे. केंद्र सरकारकडून महागाई कमी करण्यासाठी कसल्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. अनेक फसव्या घोषणा करून केंद्र सरकार नागरिकांची दिशाभूल करीत आहे. महागाई कमी करण्याचा प्रयत्न झाला नाही, यापुढेही काँग्रेस पक्षाकडून उग्र आंदोलन केले जाणार आहे."

- बसवराज पाटील, कार्याध्यक्ष प्रदेश काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT