bus 
मराठवाडा

उमरगा आगाराला एका दिवसात तीस हजाराचे उत्पन्न, ८१४ प्रवाशांनी केला प्रवास

अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने आंतरजिल्हा बस सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुरूवारी (ता.२०) एका दिवशी २१ बसफेऱ्यातून जवळपास तीस हजारांचे उत्पन्न उमरगा आगाराला मिळाले. साडेचार महिन्यात पहिल्यांदाच एका दिवशी एवढे उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान २२ मे पासुन काही मार्गावर बस सुरू केल्या होत्या.

कोरोना बाधितांची संख्या वाढल्यानंतर फेऱ्यामध्ये व्यत्यय आल्याने तेव्हा २३ दिवसांत कालावधीत आगाराला एक लाख ४१ हजार ५१७ रुपयाचे उत्पन्न मिळाले होते. आता आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्याने आगाराला उत्पन्नाची अपेक्षा निर्माण झाली आहे. टाळेबंदीमुळे बस वाहतूक पूर्णतः विस्कळीत होती. कोट्यावधी रुपयांचे आर्थिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे.

मध्यंतरी जिल्हाअंतर्गत बस सुरू केल्यानंतर पहिल्या दिवशी फक्त पाचशे रुपयांचे आर्थिक उत्पन मिळाले होते. आठ जूनच्या २१ बसफेऱ्यातून केवळ अकरा हजार ८७६ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. मालवाहू बसलाही प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान आंतरजिल्हा बससेवा सुरू झाल्यानंतर गुरुवारी लातूरला सात सोलापूर तीन, अक्कलकोट तीन, उस्मानाबाद दोन, कंटेकूर दोन, डिग्गी दोन, निलंगा एक तर दाळिंब-माकणी एक अशा २१ फेऱ्यातून ८६५ प्रवाशांनी प्रवास केला त्यातून जवळपास तीस हजाराचे उत्पन्न मिळाले.



टाळेबंदीमुळे बससेवेला व्यत्यय आला. आंतरजिल्हा बसफेऱ्या सुरू झाल्याने उत्पन्न अपेक्षित आहे. गुरूवारी पहिल्या दिवशी संततधार पावसामुळे जेमतेम प्रवाशी होते. प्रवाशी वाढत राहिले तर फेऱ्याही वाढविण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रवाशांची साथ महत्त्वाची आहे. बससेवा सुरक्षित असून प्रवाशांनी अखंडीत सेवा परंपरेला सहकार्य करावे.
-  पी.व्ही.कुलकर्णी, आगारप्रमुख, उमरगा
 

(संपादन : गणेश पिटेकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT