PM Svanidhi Yojana Sakal
मराठवाडा

PM Svanidhi Yojana : ५२४ फेरीवाल्या व्यावसायिकांना बँकांमार्फत ७६ लाखाचे कर्ज वाटप

गंगापूर पालिकेकडून उत्कृष्ट अंमलबजावणी

बाळासाहेब लोणे

गंगापूर : केंद्र शासनामार्फत फेरीवाल्यांसाठी सुरू झालेल्या पी.एम. स्वनिधी या योजनेच्या माध्यमातून नगरपरिषद, गंगापूर अंतर्गत ५२४ फेरीवाले व्यावसायिकांना बँकांमार्फत ७६ लाखाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.

कोव्हिड कालावधीत फेरीवाला व्यावसायिकांना झालेल्या नुकसानीची दखल घेऊन केंद्र शासनाने जून २०२० मध्ये प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. या योजनेत प्रथम टप्प्यात १० हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात २० हजार रुपये व तिसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येते.

या योजनेची अतिशय उत्कृष्ट अंमलबजावणी करत नगरपरिषद गंगापूरने ५२४ व्यावसायिकांना ७६ लाख रुपयांचे कर्ज बँकांमार्फत वाटप केले आहे. या योजनेमध्ये विविध राष्ट्रीयकृत बँकांनी सहकार्य केले. योजनेमार्फत सात टक्के वरील व्याज केंद्र सरकार भरणार आहे.

तर उर्वरित व्याज लाभार्थीला भरावे लागते. या योजनेच्या यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी श्रीमती पल्लवी अंभोरे यांनी प्रकल्प अधिकारी उदय जऱ्हाड यांना मार्गदर्शन केले.

नियमांचे पालन केल्यास कर्जमर्यादा वाढणार

या योजनेत १० हजारांपासून ५० हजारांपर्यंत कर्ज, नियमांचे पालन केल्यास ५० हजारांपर्यंत कर्ज मिळणार आहे, दहा हजारांचे कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास विक्रेत्यांना २० व त्यानंतर ५० हजारांचे कर्ज वाढून मिळेल.

 लाभार्थीचा व्यवसाय वाढविण्यासाठी आम्ही सहकार्य करतो. शहरातील पथविक्रेते, फेरीवाल्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

- पल्लवी अंभोरे(मुख्याधिकारी)

लाभार्थ्यांनी १० हजार रुपये कर्जाचे हप्ते नियमितपणे भरून पुढील २० व ५० हजार रुपये कर्जाचा लाभ घेण्यासाठी बँकेला सहकार्य करावे.

- उदय जऱ्हाड(प्रकल्प अधिकारी)

कोव्हिड कालावधीत व्यवसाय बंद झाला होता. पीएम स्वनिधी योजनेचा लाभ मिळाल्याने व्यवसाय पुन्हा सुरु केला. प्रथम १० हजार रुपये कर्जाची नियमित परतफेड करून आता २० हजार रुपये कर्ज घेतले आहे.

 - मच्छिंद्र खाजेकर (लाभार्थी) -

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेपर लीक आंदोलनानंतर दिल्लीत E20 इंधन धोरणाविरोधात टॅक्सी संघटनांचा एल्गार; 4 ऑगस्टला संसद मार्चची घोषणा!

'हे काय नवीन? २', 'तुंबाडची मंजुळा'आणि इतर बरंच काही; झी ५ वर येतोय मनोरंजनाचा धमाका, पाहा नवीन रिलीजची यादी!

Akola News: शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोहसीन शेख यांच्या मृत्यूने खळबळ; अपघात की कट ?, माजी जिल्हाप्रमुखांवर कुटुंबीयांचा थेट आरोप

Who Is Yash Thakur? आईची भीती अन् भारताला मिळाला नवा स्टार! 'वुशू'चे मैदान सोडणारा विदर्भाचा यश कसा बनला फास्ट बॉलर?

Whatsapp New Features : व्हॉट्सॲपने केला मोठा धमाका! 'या' युजर्सना मिळतायत जबरदस्त फीचर्स; PDF एडिटिंगसुद्धा सामील

SCROLL FOR NEXT