file photo 
मराठवाडा

दुर्दैवी घटना : लहान भावाला वाचविताना मोठ्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू : जिंतूर तालुक्यातील बेलखेडा येथील घटना

राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जिल्हा परभणी) : तलावात पोहत असतांना लहान भाऊ पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. ३१) दुपारी तीनच्या सुमारास बेलखेडा शिवारात घडली. सोनाजी उर्फ पप्पू एकनाथ सूर्यवंशी (वय १८) असे मृताचे नाव आहे.

सध्या तालुक्यात सर्वत्र संचारबंदी लागू असल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी आहे. त्यात चारपाच दिवसापासून तीव्र उन्हाचा कडाका सुरु असल्याने तालुक्यातील पाचलेगाव येथील अकरावीत शिकत असलेला सोनाजी त्याचा धाकटा भाऊ गजानन सूर्यवंशी व त्यांचा मित्र सिद्धार्थ सखाराम घुगे हे तिघे दुपारच्यावेळी बेलखेडा येथील तलावात पोहण्याकरिता गेले होते. पोहत असतांना गजानन बुडत असल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी सोनाजीने त्याच्या दिशेने झेप घेतली. पाठोपाठ सिध्दार्थही गेला परंतु सोनाजी यास पाण्याचा अंदाज आला नसल्यामुळे तो स्वतः च पाण्यात बुडाला. परंतु सिद्धार्थ याने मित्राच्या भावाला सुखरुप पाण्याबाहेर काढले.

घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तलावात सोनाजीचा शोध घेतला. तब्बल दोन तासाच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. सोनाजीचा मृतदेह जिंतूर येथील रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणला. परंतु याबाबत दुसरे दिवशी (ता. एक)दुपारपर्यंत पोलिस ठाण्यात कोणी माहिती दिली नसल्याने पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली नसल्याचे समजले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price: LPG गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त! कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय? जाणून घ्या

Thane Ring Metro : 1988 ची संकल्पना अखेर प्रत्यक्षात! भिवंडी, कल्याण अन् मुंबईचा प्रवास होणार अतिशय सोपा; ठाण्याच्या 'रिंग मेट्रो' प्रकल्पाचा रंजक प्रवास माहितीये का?

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT