nanded news 
मराठवाडा

विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी घेतली ‘लॅब’ची धसकी, कशामुळे? ते वाचाच

शिवचरण वावळे

नांदेड : ‘कोरोना’ संशयित रुग्णांच्या घशातील लाळेचे ‘स्वॅब’ नमुने चाचणीचा अहवाल लवकर प्राप्त व्हावा, यासाठी नांदेड जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे ‘कोरोना’ विषाणूची चाचणी लॅब सुरु करण्यात आली. सुरुवातीच्या दोन ते तीन दिवसात या लॅबमध्ये ‘कोरोना’ संशयितांच्या स्वॅबचे नमुने तपासणी करण्यात आले. त्यामुळे औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत खेटे मारणे थांबले.

यापूर्वी कोरोना संशयितांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात येत. नांदेड - पुणे अंतर जास्त असल्याने पाठविलेल्या ‘स्वॅब’चा अहवाल येण्यास किमान दोन दिवस वाट बघावी लागत. म्हणून औरंगाबाद येथे सुरु झालेल्या लॅबकडे हे नमुने तपासणीसाठी पाठवणे सुरु झाले. मात्र, या ठिकाणी देखील पीपीइ किटची कमतरता, स्वॅब तपासणी यंत्रणेवर अती ताण येत असल्याने इथेही स्वॅब अहवाल मिळण्यासाठी तितकाच विलंब व्हायचा. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यासाठी स्वतंत्र ‘कोरोना’ चाचणी लॅबची मागणी केली. त्यास तत्काळ मान्यता मिळाली आणि अगदी काही दिवसातच नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ही अत्याधुनिक ‘लॅब’ सुरु झाली.

शनिवारी (ता.२५ एप्रिल २०२०) विद्यापीठातील एक प्राध्यापकास सहज फोन केला, लॉकडाउनबद्दल माहितीचे आदान प्रदान झाले. त्यानंतर मात्र विद्यापीठातील या प्राध्यापकाने स्वतः काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी ‘लॅब’ सुरु झाल्याचा धसका घेतल्याची धक्कादायक माहिती उघड केली. त्यामुळे विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी लॅबविषयी अनेक प्रश्न मनात घर करुन बसले आहेत.

‘कोरोना’ व्हायरस आजार सर्वांसाठी नवीन असल्याने ‘कोरोना’ कुणाला होतो? कसा होतो? त्यासाठी नेमकी काय खबरदारी घ्यावी? अशा एक ना अनेक गोष्टींबद्दल कर्मचारी अज्ञान आहे. त्यामुळे विद्यापीठात सुरु झालेल्या लॅबमध्ये काही गडबड झाली तर, कसे होणार? लॅबमध्ये काम करणारे तज्ज्ञ प्राध्यापक, कर्मचारी प्रत्येक विभागात ये-जा करतात, तेव्हा त्यांच्या संपर्कातुन ‘कोरोना’ची लागण झाली तर कसे होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT