file photo 
मराठवाडा

हिंगोली पंचायत समितीच्या उपसभापतीपदी ज्ञानबा कवडे यांची बिनविरोध निवड

राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी सोमवारी ( ता.पाच ) झालेल्या निवडीत महाविकास आघाडीचे ज्ञानबा कवडे यांची बिनविरोध निवड झाली. 

हिंगोली पंचायत समितीत महाविकास आघाडीची सत्ता आहे. मागील ता.पाच फेब्रुवारी रोजी काँग्रेसच्या उपसभापती  गंगाबाई गावंडे यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी सभापती यांच्याकडे राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी सोमवारी झालेल्या निवड प्रक्रियेत काँग्रेसचे ज्ञानबा कवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निर्वाचन अधिकारी यांनी केली आहे. 

उपसभापती निवडीच्या प्रक्रियेला येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी दहा ते १२ यावेळेत नामनिर्देशन अर्ज सादर करण्यासाठी वेळ दिला होता. मात्र एकच अर्ज आल्याने ज्ञानबा कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.या सभेला वीस पैकी १५ सदस्य उपस्थित होते. निर्वाचन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे ,गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे, नायब तहसीलदार एस. आर. जिरंगे , सहाय्यक गटविकास अधिकारी जी. पी. बोथिकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. या प्रक्रियेसाठी प्रशांत बोरसे, सी. आर. गोळेगावकर ,मुकुंद कारेगावकर यांनी परिश्रम घेतले.

त्यांच्या निवडीनंतर त्यांचा  माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी सत्कार केला. यावेळी रणजित पाटील, भैय्या देशमुख, बाजीराव जुमडे, दतराव कडतीकर, भास्कर बेंगाळ, पंढरीनाथ ढाले, गणेश गडदे, नामदेव राठोड, बबन नेतने, रुपाजी कर्हाळे,  रंगनाथ पाटील, संगीता गंगावणे, संध्या भगत, कावेरी कऱ्हाळे, मुक्ता गोरे, ग़ंगाबाई गावंडे आदींची उपस्थिती होती. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT