Damage crop Sakal
मराठवाडा

हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस

वादळी वाऱ्याने टाळकी ज्वारीचे नुकसान, वीज कोसळुन बैल दगावला

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली - हिंगोली जिल्ह्यात रविवारी ता. २४ रात्री दोन वाजता मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने उभ्या टाळकी ज्वारीचे तसेच हळद, आंबा पिकांचे नुकसान झाले. तर वीज कोसळुन बैल दगावल्याची घटना घडली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते. हिंगोली जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला होता. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवसापूर्वी पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या होत्या. परत शनिवारी देखील ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रविवारी भल्यापहाटे दोन वाजता विजेच्या कडकडाटात पाऊस झाला. दोन वाजता सुरू झालेला विजेचा कडखकडात साडेपाच पर्यंत सुरू होता.

दरम्यानच्या काळात हलका ते मध्यम स्वरुपाचा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या पावसाने आंबा पिकासह हळद व शेतात उभ्या असलेल्या टाळकी ज्वारीचे नुकसान झाले आहे. वसमत तालुक्यातील सिरळी येथे शेतात बांधलेल्या सधन मारकड या शेतकऱ्यांच्या बैलावर विज कोसळल्याने बैल दगावला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतात उभ्या असलेल्या टाळकी ज्वारी पिकांचे नुकसान झाले. या पावसात हिंगोली शहरासह अनेक ठिकाणी विज पुरवठा खंडित झाला होता. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर झाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या हळदीचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे देखील नुकसान झाले आहे. यात टमाटे, कोथींबीर, पालक आदीचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT