Jalna News sakal
मराठवाडा

Jalna News : वीज पडून महिलेसह दाेघांचा मृत्यू ; जालना, संभाजीनगर जिल्ह्यांत पाऊस, गारपीट

दिवसा उन्हाच्या बऱ्यापैकी झळा आणि सायंकाळनंतर थंडी, असे आठवडाभर वातावरण असताना सोमवारी (ता. २६) छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस झाला.

सकाळ वृत्तसेवा

जालना, छत्रपती संभाजीनगर : दिवसा उन्हाच्या बऱ्यापैकी झळा आणि सायंकाळनंतर थंडी, असे आठवडाभर वातावरण असताना सोमवारी (ता. २६) छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस झाला. भोकरदन तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.

मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत आज काहीसे ढगाळ वातावरण होते. उन्हाची तीव्रता फारशी नव्हती. जालना जिल्ह्यातील भोकरदन, अंबड, शहागड, अंकुशनगर, गोंदी, वडिगोद्री, टेंभुर्णी व पारधसह अन्य काही गावांत सायंकाळी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपीट झाली.

वादळामुळे काही घरांवरील पत्रे उडाले. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली. रब्बीतील काही पिकांना या वादळ, पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर तालुका, फुलंब्री, कन्नड, सिल्लोड तालुक्यांमधील काही गावांत वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला. भोकरदन तालुक्यात वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यात एका शेतकरी महिलेचा समावेश आहे.

शिवाजी गणपत कड (वय ३८, रा. सिपोरा बाजार) व अर्चना ऊर्फ पल्लवी विशाल दाभाडे (२१, रा. कुंभारी) अशी मृतांची नावे आहेत. शिवाजी कड हे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गोठ्यात जनावरे बांधण्यासाठी घराबाहेर पडले. यावेळी अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा असा परिवार आहे. पाऊस सुरू झाल्याने कुंभारी येथील अर्चना ऊर्फ पल्लवी दाभाडे या शेतातून घरी परतत होत्या. त्याचवेळी अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती व दोन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT