file photo 
मराठवाडा

मास्क वापरा, लस घ्या, गर्दी टाळा, जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या जनतेला सुचना

राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवरून चिंतित झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल मिडीयावरून जनतेला आवाहन केले आहे. कोरोना प्रतिबंधक उपायोजना करणे व लस घेण्याची सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी नागरिकांना केली आहे.

दरदिवशी १०० च्या जवळपास रुग्ण सापडत असल्याने परिस्थिती आता गंभीर होत चालली आहे असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली की, गतवर्षी या तारखेला जी रुग्ण संख्या होती त्यापेक्षा अधिक संख्या जिल्ह्यात  झाली आहे. लोकांनी कोरोना नियंत्रणात आल्याचे वाटत असताना परिस्थिती पुन्हा बिघडते आहे. 

प्रशासनाने आवश्यक त्या सर्व व्यवस्था केल्या असल्या तरी संसर्ग वाढू नये हाच खरा उपाय  असल्याचे ते म्हणाले. यासाठी महत्वाचे सर्वांनी जबाबदारी पाळायला हवी. चांगल्या प्रतिचा मास्क बापरावा आणि सतत हात थुत रहावे सामाजिक अंतर पाळावे अशी सूचना त्यांनी केली.

यापुढे कुठे गर्दी केल्याचे दिसून आल्यास कडक कारवाई करण्याचा ईशाराही त्यांनी दिला लग्न समारंभ शक्य असल्यास पुढे ढकलावे असे आवाहन करून शक्य नसल्यास २० ते  २५ लोकांमध्ये लग्नाचा सोहळा उरकावा असेही त्यांनी सांगितले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT