lohara news 
मराठवाडा

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ काढली दुचाकीची अंतयात्रा

नीळकंठ कांबळे

लोहारा (जि. उस्मानाबाद): युवा सेनेच्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.पाच) शहरातून दुचाकीची अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी कार्यकत्यांंनी जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र सरकारचा निषेध केला.

केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशभरात इंधन दरात मोठी वाढ झाली आहे. परिणामी महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजट कोडमडले आहे. वाढत्या महागाईमुळे जनतेचे हाल होत असताना केंद्र सरकार कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने युवा सेनेच्या वतीने आज दुपारी साडे तीनच्या सुमारास शहरातील जगदंबा मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत दुचाकीची अंतयात्रा काढण्यात आली.

यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडेरच्या दरात कपात करावी, या मागणीचे निवेदन पेशकार बालाजी चामे यांना देण्यात आले. या वेळी युवा सेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, जिल्हा उपप्रमुख नामदेव लोभे, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, युवा शहरप्रमुख श्रीकांत भरारे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, नगरसेवक श्याम नारायणकर, अभिमान खराडे, अमीन सुंबेकर महेबूब गवंडी, अमीन मुलानी, दत्ता पाटील, भरत सुतार, बाळासाहेब कोरे, सलीम सय्यद, सुरेश दंडगुले, बळिराम गोरे, प्रेम लांडगे, नितीन जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: धक्कादायक! गर्भवती महिलेचं लैंगिक शोषण अन् साप...; अशोक खरातवर आणखी एक गुन्हा दाखल

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

'अशोकमुळे ती लिंबू कलरची साडी फेमस झाली' अशी ही बनवाबनवी सिनेमाबद्दल बोलताना अश्विनी भावे म्हणाल्या...'सचिनचं ते स्त्री पात्र...'

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

SCROLL FOR NEXT