teachers  sakal
मराठवाडा

गुरुजींच्या लसीकरण आकडेवारीमुळे दमछाक

शिक्षण उपसंचालकांनी मागविली माहिती, शिक्षण विभागाची धावाधाव

सुहास सदाव्रते

जालना : औरंगाबाद विभागाचे शिक्षण उपसंचालक यांनी आदेश काढले आणि शिक्षण विभागाची सुरु झाली धावाधाव...पर्यवेक्षकीय यंत्रणेची उडाली धांदल अन् लिंकवर माहिती भरण्याचे तातडीचे आदेश. बुधवारी ( ता.१५ ) दिवसभर शिक्षण विभागाची चांगलीच दमछाक पाहायला मिळाली,हे विशेष.

दीडवर्षांपासून कोरोना संसर्गजन्य परिस्थितीत शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे.अद्यापही ग्रामीण भाग आणि शहरी भागात वेगवेगळे नियम आहेत.एकीकडे ग्रामीण भागात शाळा कनिष्ठ महाविद्यालये सुरु आहेत तर दुसरीकडे शहरी भागात बंदच आहे.ऑनलाइन ऑफलाइन यातील दरी अजूनही संपलेली नाही. शाळा सुरुवात करण्यापूर्वी शिक्षकांचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते.याबाबत अनेक शाळांनी शिक्षकांचे लसीकरण करून घेतले.शिक्षण विभागाने यासंदर्भात माहितीही मागविली होती.यात जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील जवळपास बाराशे शिक्षकांचे लसीकरण होणे मागील महिन्यात बाकी होते.

दरम्यान खाजगी प्राथमिक, माध्यमिकसह कनिष्ठ महाविद्यालयातील किती शिक्षकांनी लसीकरण करून घेतले याबाबत विभागाकडे आकडेवारी आली की नाही हे स्पष्ट होत नाही.औरंगाबाद विभागाचे शिक्षण उपसंचालक साबळे यांनी बुधवारी ( ता.१५ ) विभागातील शिक्षणाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली खरी परंतु यात जालना आणि परभणी जिल्ह्यातील माहिती शून्य असल्याचे अहवालात नमूद केले आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागातील पर्यवेक्षकीय यंत्रणेची चांगलीच झोप उडाली.आतापर्यंत किती शिक्षकांनी लसीकरण केले याची निश्चित आकडेवारी विभागाकडे अपडेट असू नये याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

जालना,औरंगाबाद,बीड, परभणी,हिंगोली या पाच जिल्ह्यातील प्राथमिक विभागातील ५ हजार ३३४,माध्यमिक विभागातील शिक्षक १ हजार १२९ तर कनिष्ठ महाविद्यालयीन ५३९ एवढीच संख्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. यातही जालना आणि परभणी जिल्ह्याची आकडेवारी शून्य दाखविण्यात आली आहे.दरम्यान शिक्षण विभागाने सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणांना तातडीचे आदेश देत विशेष लिंक तयार केली असून केंद्र प्रमुखांनी सदर माहिती तात्काळ ऑनलाइन भरावी असे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षक लसीकरण माहिती अपडेट नसल्याने दिवसभर शिक्षण विभागात अधिकाऱ्याची चांगलीच धावपळ पाहायला मिळाली.

"जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची यापूर्वी माहिती ऑनलाइन देण्यात आली आहे.पुन्हा नव्याने आदेश येताच लिंक तयार करण्यात आली असून तातडीने माहिती जमा करण्याचे काम सुरु आहे."

- कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी,जालना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT