jalna sakal
मराठवाडा

Jalna : मिशन कवच कुंडलमुळे लसीकरण वेगात

मुरमा खुर्द येथे मोहिमेस ग्रामस्थांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

घनसावंगी : जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या पुढाकाराने मुरमा खुर्द येथे मिशन कवच कुंडल कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियान राबविण्यात आले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र पवार, गटविकास अधिकारी एम.जी. जाधव, जिल्हाध्यक्ष डी.बी.काळे, जिल्हा सरचिटणीस पी.एस.वाघ, मानद अध्यक्ष पी .बी .पवार, माजी कार्याध्यक्ष श्री. घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी महेंद्र पवार यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मिशन कवच कुंडल अभिमान यशस्वी करण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केले.

ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी.बी. काळे यांनी, तालुक्‍यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी मिशन कवच-कुंडल अभियान कालावधीमध्ये कार्य करीत गावात शंभर टक्के लसीकरण करावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमांच्या यशस्वितेसाठी ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू कुरंगळ, सचिव विनोद भगत,ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले या वेळी कक्ष अधिकारी एस.डी.मान्टे, विस्तार अधिकारी नागलवाड , पी.पी. खिल्लारे, ग्रामविकास अधिकारी श्री. मुपडे, यु.आर.मंदोडे, एस. व्ही. काचेवाड, एस .आर. तौर, एस .बी .शेजुळ, एस. एन. मधाडे, आर. एन. भुतेवाड, डी. आर. चौधरी, राकेश पवार, व्ही. आर. झोरे, श्री.रुपनर, श्री. वखरे, आर. एच. काळे, यू .डी .तौर , देवकन्या जवजे यांच्यासह शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस, आशा कार्यकर्ती यांच्यासह कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी .एन.सोनवणे यांनी केले. ग्रामविकास अधिकारी व्ही बी .गायकवाड यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PCMC ACB raid on Chief Engineer : पिंपरी-चिंचवड महापालिकेत ACB ची मोठी कारवाई! थेट मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयातच धाड; ठेकेदाराकडून लाच मागताना बड्या अधिकाऱ्याला बेड्या

चंद्राच्या राशीबदलामुळे ‘या’ ३ राशींनी जरा जपून राहावं; बँक बॅलन्सला धोका? पैशांचं नुकसान टाळण्यासाठी कोणत्या राशींनी राहावं सावध?

Satej (Bunty) Patil on Hasan Mushrif Gokul : 'त्यांना गोकुळ दूध संघच बंद पाडायचाय!' हसन मुश्रीफांच्या टीकेनंतर बंटी पाटलांचा थेट आरोप, 'सहकारातील काळा दिवस' म्हणत मांडली रोखठोक भूमिका!

Latest Marathi News Update: पिंपरी-चिंचवड महापालिकेत मुख्य अभियंता प्रवीण ओंबासे एसीबीच्या जाळ्यात

iPhone Duo Screen Issue: Apple iPhone Duoच्या स्क्रीनला तडे! कंपनीकडून रिप्लेसमेंट मिळणार का? नेमकं प्रकरण काय जाणून घ्या

SCROLL FOR NEXT