file photo 
मराठवाडा

वडापाव विक्रेत्याने पिस्तुल फेकला नदीत

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरात गावठी पिस्तोलांनी हाहाकार माजविला असून ठीक- ठीकाणी गोळीबाराच्या घटनाही घडल्या आहेत. दरम्यान एका वडापाव विक्रेत्याने एका बिहारी इसमाकडुन खरेदी केलेले गावठी पिस्तोल गोदावरी नदीत फेकुन दिल्याचा प्रकार ता. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आला. त्या वडापाव विक्रेत्याकडुन पोलिसांनी एक जिवंत काडतुस व अन्य साहित्य केले.

शहरात अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. त्या पाश्र्वभुमीवर पोलिस बारिक नजर ठेवून आहेत. दरम्यान अण्णाभाऊ साठे चौकात एका गाड्यावर वडापाव विक्री करणारा तानाजी उर्फ अजय चव्हाण रा. कॅनाल रोड याच्याकडे गावठी पिस्तोल व काडतुस असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्ताराम राठोड यांच्या आदेशावरुन स्थागुशाचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा इनकाऊंटर फेम पांडुरंग भारती व त्यांच्या सहकाऱ्यांनी हातगाड्यावर छापा टाकला. यामध्ये वडापाव विक्रेत्याची चौकशी केली असता त्याच्या गाड्यावर वडापाव खाण्यासाठी येत असलेल्या एका बिहारी इसमाकडे गावठी पिस्तोल राहत असे. ते पिस्तोल वडापाव विक्रेता तानाजी चव्हाण याने सहा हजार ५०० रुपयात खरेदी केले होते. परंतू गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी शोधमोहिम सुरु करुन अनेक पिस्तोल बाळगणाऱ्यांंना जेरबंद केले. 

नांदेडात सहज पिस्तुल खरेदी- विक्री

पोलिसांच्या या कारवाईला घाबरुन वडापाव विक्रेत्याने खरेदी केलेले पिस्तोल गोदावरी नदीत गोवर्धन घाट परिसरात जावून फेकुन दिले. तर काडतुस एका पानटपरीत ठेवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामध्ये पोलिसांनी वडापाव विक्रेत्यास ताब्यात घेवून एक जिवंत काडतुस जप्त केले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने या आरोपीला भाग्यनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिस निरीक्षक अनिरूध्द काकडे यांनी त्याला शुक्रवारी (ता. २७) नांदेड न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत पाठविले आहे. हा तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. बोनवाड करीत आहेत.

पोलिसांची अनेकांना धास्ती 

शहरात झालेल्या गोळीबाराच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी ज्याच्याकडे शस्त्राचा परवाना आहे. अशांची तपासणी करून त्यांच्या असे लक्षात आले की, गोळीबाराच्या घटना ह्या अवैध मार्गाने मिळविलेल्या शस्त्राद्वारे केल्या जात आहे. त्यामुळे त्यांनी गुप्त माहिती काढून अशा लोकावर बारीक लक्ष ठेवले आहे. त्यामुळे अशा लोकांनी पोलिसांच्या हाती लागु नये म्हणून आपल्या जवळील पिस्तुल कुठेतरी लपवून ठेवण्यात येत आहेत. तेच काहीनी तर निर्जनस्थळी पाण्यात, नदीत फेकल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

Pune Water Security: पुण्याच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी खडकवासला प्रकल्पातील धरणांतील गाळ काढण्यास संयुक्त समितीचा प्रस्ताव

Ahilyanagar Kalyan Highway: करंजाळे हद्दीत नव्याने बांधलेला अहिल्यानगर–कल्याण महामार्ग खचला; निकृष्ट कामावर संताप, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Latest Marathi News Live Update : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, धरणसाठयाने गाठली मागील वर्षाची सरासरी

England Test Captain: इंग्लंडच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार कोण? ECBच्या एका निर्णयाने वाढवलं सस्पेन्स,नेमकं कोणाचं नाव चर्चेत?

SCROLL FOR NEXT