Bharati Thorat sakal
मराठवाडा

Vaijapur Crime : दिवाळीच्या दिवशी विवाहितेचा खून; आरोपी ताब्यात

हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील वीरगाव येथे उघडकीस आली.

सकाळ वृत्तसेवा

वैजापूर - हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील वीरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कापुसवाडगाव येथे रविवारी (ता.१२) सकाळी उघडकीस आली. दरम्यान, ऐन दिवाळीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

भारती संतोष थोरात (वय ३६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी संतोष दिनकर थोरात (पती), दिनकर माणिकराव थोरात (सासू), रंजना दिनकर थोरात (सासू) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले आहे. वीरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील भायगाव गंगा येथील भारती हिचे कापूसवाडगाव येथील संतोष दिनकर थोरात याच्याशी १२ वर्षापूर्वी लग्न झाले होते.

लग्नामध्ये दीड लाख रुपये हुंडा, सोन्याचे दागिने, संसारपयोगी वस्तु देण्यात आल्या. मात्र, लग्नानंतर पाच ते सहा महिन्यांनी सासरच्या मंडळींनी पैशासाठी भारतीचा छळ सुरू केला. माहेराहून पैसे घेऊन ये, अशी मागणी तिच्याकडे करण्यात येत होती. पैसे न आणल्याने शनिवारी रात्री झोपेतच तिचा गळा दाबून खून करण्यात आला.

सकाळी या विवाहितेला आठ वाजता वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून ती मृत असल्याचे सांगितले.

या प्रकरणी भारती हिचा भाऊ ज्ञानेश्वर भगवान कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीचा पती, सासरा, सासू या तिघांविरुद्ध वीरगाव पोलिस पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वीरगाव पोलिस करीत आहेत. भारती या विवाहितेच्या पश्चात मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Rate: अहमदाबादमध्ये पेट्रोल 101 रुपयांवर, महाराष्ट्रात किती? पाहा पेट्रोल-डिझेल अन् LPG सिलेंडरचे ताजे दर

Marathi News Live Updates : एमपीएससीचे विद्यार्थी चर्चेला तयार- सुप्रिया सुळे

Miraj Railway: मिरज-कोल्हापूरमार्गे धावणाऱ्या गाड्यांमध्ये बदल; पुणे विभागातील मेगा ब्लॉकचा परिणाम; काही गाड्यांचे मार्ग बदलले, काहींचा प्रवास अंशतः कमी

Vastu Tips: घर सुंदर दिसावं म्हणून नकली झाडं लावताय? थांबा! वास्तूनुसार ‘या’ ठिकाणी ठेवलेली आर्टिफिशियल झाडं घरासाठी ठरू शकतात अशुभ

अचानक आवाज झाला अन् इमारत कोसळली, घटनेचा CCTV VIDEO समोर; ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, अजूनही बचावकार्य सुरू

SCROLL FOR NEXT