Sandipan Bhumare sakal
मराठवाडा

Vaijapur News : तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती; संदीपान भुमरे यांची टीका

सत्ता असताना आमदारांसाठी वेळ नव्हता, टिव्ही चालू बंद केल्यावरच जनतेला मुख्यमंत्रीचे दर्शन व्हायचे.

सकाळ वृत्तसेवा

सत्ता असताना आमदारांसाठी वेळ नव्हता, टिव्ही चालू बंद केल्यावरच जनतेला मुख्यमंत्रीचे दर्शन व्हायचे.

वैजापूर - सत्ता असताना आमदारांसाठी वेळ नव्हता, टिव्ही चालू बंद केल्यावरच जनतेला मुख्यमंत्रीचे दर्शन व्हायचे. परंतु वेळ अशी बदलली की, कुणी खो-खोच्या उद्घाटनासाठी उद्धव व आदित्य ठाकरेला बोलावले तरी त्यांना उपस्थित राहण्यासाठी वेळ मिळतो. तेव्हाच जर असा वेळ दिला असता तर आज ही वेळच आली नसती असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी केले आहे.

बुधवारी (ता. ८) तालुक्यातील लोणी व तलवाडा येथे तब्बल ४ कोटी ९७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि प्रवेश सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार रमेश बोरणारे, उपनगराध्यक्ष साबेर खान, रामहरी जाधव, तालुकाअध्यक्ष राजेंद्र सालुंखे, शहराध्यक्ष पारस घाटे, पदमा सालुंखे, सुप्रिया व्यवहारे, संजय बोरणारे, रणजीत चव्हाण, महेश बुनगे, अमोल बोरणारे, आमेरअली आदींची उपस्थिती होती.

यावेळी श्री पुढे भुमरे म्हणाले, टिव्ही समोर बसून जनतेचे प्रश्न सुटत नसतात. सत्ता होती त्यावेळी आमदारांसाठी वेळ नव्हता. आता कुणी खो-खोच्या उद्घाटनला बोलावले तरी ठाकरे पिता, पुत्र हजर राहतात. ही परिस्थिती केवळ मातोश्रीवर चिकटलेल्या चार लोकांमुळे ठाकरेवर आल्याचेही ते म्हणाले. तसेच रोजगार हमीमध्ये शेतकरी व अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे काम करावे याचे काही 'गुपीत' टिप्स भुमरे यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, यावेळी बाजार समितीचे माजी सभापती भागिनाथ मगर, संचालक संतोष सूर्यवंशी यांच्यासह विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

खैरेंचे डिपॉझिट जप्त करतो

माजी खासदार चंद्रकांत खैरे गेल्या चाळीस वर्षापासून राजकारण करत आहे. मात्र,या खैरेंनी जिल्ह्याचे वाटोळे केले. खैरे खासदार असताना केंद्रीय विकास रस्ते अंतर्गत निधी कसा मिळतो हे सुद्धा त्याला कळत नव्हते. ते मी शिकवले आज तेच खैरे भुमरेंना काय कळते, असे म्हणतात. मात्र, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेमध्ये खैरेंचे डिपॉझिट जप्त करतो. तेव्हा खैरेंना कळेल भुमरे काय चीज आहे, मंत्री भुमरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India WPI Inflation : देशात महागाईचा स्फोट! सामान्यांच्या खिशाला बसणार फटका, रोजच्या खर्चात होणार वाढ

Deepti Sharma: गेल्या वर्षी वर्ल्ड कप जिंकवला, अन् आता पाकिस्तानलाही नडली! भारताच्या 'या' लेकीने ऐतिहासिक विजयानंतर नेमकं काय म्हटलं?

Madhuri Elephant Return Kolhapur : 'माधुरी' हत्तीण महिन्याभरात कोल्हापूरला येणार!, वनताराची टीम नांदणीत पुनर्वसन केंदाच्या पाहणीसाठी दाखल

Latest Marathi News Live Update : पद्मसिंह पाटील कोर्टात दाखल

Whatsapp मध्ये मोठं अपडेट! आता विना मोबाईल करता येणार व्हिडिओ अन् ग्रुप वॉइस कॉल; पण कसं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT