varad.jpg 
मराठवाडा

‘वरद’ने वाढदिवस नाकारला

श्याम जाधव


नवीन नांदेड ः ‘कोरोना’च्या लढाईत छोटी मुलंही उतरलेली दिसत असून आपापल्या परीने कोरोनाच्या विरोधात शक्य होईल तसे लढण्यास मदत करत आहेत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. एम. के. पाटील यांच्या वरद नावाच्या मुलाने स्वतःचा वाढदिवस साजरा न करता आपण जमवलेले जे पैसे पाच हजार होते ते मुख्यमंत्री निधीसाठी दिले आहेत.


सहायता कक्षात मदत करण्याचे आवाहन 
कोरोना विषाणूने देशासह महाराष्ट्रात हाहाकार माजविला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली आहे. तसेच पंतप्रधान मदत कक्षात मदतीचे आवाहन केले आहे. राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मुख्यमंत्री सहायता कक्षात मदत करण्याचे आवाहन केले आहे. अनेक जण आप आपल्या परीने शासनास मदत करीत आहेत. गेली काही दिवस परिस्थिती मुलांनाही लक्षात येऊन राहिली आहे. कोणालाही आपला वाढदिवस मोठा साजरा व्हावा, असे वाटत असते. परिणामी सध्याची परिस्थिती पाहता याचे परिणाम लहान मुलांना लक्षात येऊन राहिले असून पालक ही त्यांच्यावर संस्कार टाकताना दिसत आहेत.


हेही वाचा -  परभणीत १७१ जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
सर्वत्र कौतुक 
राज्यासह देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे व त्याचा सर्वसामान्यांच्या जीवनावर होत असलेल्या दुष्परिणामाच्या संवेदनेतून वरद माधव पाटील या ११ वर्षांच्या मुलाने स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचे घरातील मंडळीना कळविले. पालकांनी ही त्यास आनंदाने अनुमती दिली. वाढदिवसाचा एक उपक्रमाचा भाग म्हणून त्याने खाऊ व इतर कारणासाठी दिलेल्या पैशाच्या बचतीतून जमविलेली एकूण पाच हजार रुपयांची रक्कम या कोरानाच्या विरोधात लढणाऱ्या नर्स, डॉक्टर व पोलिसांसाठी वैद्यकीय साधने खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधीत देऊन आपली सामाजिक बांधिलकी जोपासत आगळ्यावेगळ्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. त्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्याचा हा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : डीजेच्या वादात न पडता सांस्कृतिक गणेशोत्सव साजरा करा; फडणवीस यांचे पुणेकरांना आवाहन

Lionel Messi Retirement : "हा निर्णय मनाला वेदना देणारा"; लिओनेल मेस्सीची निवृत्ती, म्हणाला, ''आता माझ्याकडे देण्यासाठी...''

Tukaram Mundhe: ‘हे तर आमचे पाळीव आहेत!’ रेस्टॉरंटच्या किचनमध्ये डझनभर उंदीर, मॅनेजरचा भन्नाट बहाणा; तुकाराम मुंढेनी सांगितला किस्सा

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT