file photo 
मराठवाडा

जैवतंत्रज्ञानाच्या वापराने  पर्यावरण संतुलन राखणे शक्य : डॉ. मित्‍तर

सकाळ वृत्तसेवा

परभणी : शेतीत रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठ्याप्रमाणात होत आहे, त्‍यास निश्चितच मर्यादा आहेत. रासायनिक किटकनाशकांच्‍या ऐवजी जैवतंत्रज्ञानाच्‍या आधारे विकसित केलेले जैविक किटक नाशकांचा वापर केल्‍यास पर्यावरण संतुलन साधता येईल, असे प्रतिपादन आस्‍ट्रेलिया येथील क्‍वीन्‍सलॅड युनिवर्सिटीच्‍या संचालिका डॉ. निना मित्‍तर यांनी केले. 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्‍ट्रीय कृषि उच्‍च शिक्षण प्रकल्‍प (नाहेप) वतीने ‘आधुनिक शेतीतील अद्ययावत डिजिटल व जैवतंत्रज्ञान साधने’ यावर ऑनलाईन आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ता. ४ ते ८ जुन दरम्‍यान, करण्‍यात आले असून या प्रशिक्षण वर्गाच्‍या उदघाटन प्रसंगी त्‍या बोलत होत्‍या.
कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू डॉ.अशोक ढवण हे होते तर भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या नाहेप प्रकल्‍पाचे राष्‍ट्रीय संचालक डॉ. आर. सी. अगरवाल, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्रकल्‍पाचे मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाल शिंदे, प्रशिक्षण वर्गाचे आयोजक डॉ. अच्‍युत भरोसे आदींचा सहभाग होता.

संशोधन कार्यास गती प्राप्‍त
कुलगुरू डॉ. ढवण म्‍हणाले, आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षण वर्गामुळे जागतिक पातळीवर जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनाची माहिती देशातील कृषि संशोधकांना होणार असून जागतिक दर्जाचे संशोधन कार्यास गती प्राप्‍त होईल. डॉ. अगरवाल यांनी नाहेप प्रकल्‍पामुळे जागतिकस्‍तरावरील कृषि संशोधनाबाबत देशातील कृषि विद्यापीठ शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्तर विद्यार्थ्‍यांना ज्ञान होऊन, देशातील कृषि संशोधन कार्यास दिशा प्राप्‍त होईल. यावेळी डॉ. गोखले यांनीही मत व्यक्त केले.


विविध देशांतील शास्त्रज्ञांचा सहभाग

या आंतरराष्‍ट्रीय प्रशिक्षणात अमेरिका, ऑस्‍ट्रोलिया, नेपाळ, अफगाणीस्‍थान, कॅनडा आदींसह देशातील विविध राज्‍यातून कृषि शास्‍त्रज्ञ व पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यी सहभागी झाले. जैवतंत्रज्ञानाशी निगडीत विविध विषयावर ऑस्‍ट्रेलियातील मेलबोर्न विद्यापीठातील डॉ. जार्ल्‍स राबीन, अमेरिकेतील वॉशिंग्‍टन स्‍टेट युनिवर्सिटीचे शास्‍त्रज्ञ डॉ. प्रशांत स्‍वामी, मोहाली येथील राष्‍ट्रीय कृषि अन्‍न जैवतंत्रज्ञान संस्‍थेच्‍या डॉ. संस्‍कृती, गुजरात येथील जुनागड कृषि विद्यापीठाचे शास्‍त्रज्ञ डॉ. रूकामसिंग तोमर, पुणे येथील डिएफआरचे  डॉ. प्रशांत कवर, ऑस्‍ट्रेलियातील वेस्‍टेर्न सिडनी युनिवर्सिटीचे डॉ. सचिन चव्‍हाण, पुणे येथील डॉ. माधुरी पगारिया,  किन्‍स युनिवर्सिटचे डॉ. अमोल घोडके, नागपुर येथील केंद्रीय कापुस संशोधन संस्‍थेचे डॉ. चिना बाबु नाईक, काश्‍मीर कृषि विद्यापीठातील डॉ. साजेद माजिद झरगर आदी मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ. शिंदे यांनी नाहेप प्रकल्‍पाबाबत माहिती दिली.  प्रास्‍ताविक व सुत्रसंचालन डॉ.भरोसे यांनी केले तर आभार डॉ.के.एम शर्मा यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ. अनिकेत वाईकर, डॉ. स्‍वाती मुंडे, सचिन कराड, श्रीमती अपुर्वा वाईकर आदींनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT