hingoli sakal
मराठवाडा

Hingoli News : औंढा तालुक्यातील सारंगस्वामी यात्रेत भाजीचा प्रसाद

दोनशे क्विंटल महाप्रसादाचे एक लाख भाविकांना वाटप, ५२९ वर्षांची परंपरा

सकाळ वृत्तसेवा

शिरड शहापूर : औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येथून जवळच असलेल्या सारंगवाडी येथील डोंगरावर सुरू असलेल्या सारंगस्वामी महाराज यात्रेत बुधवारी (ता. १७) भाजीच्या प्रसादाचा एक लाख भाविकांनी लाभ घेतला. यावेळी दोनशे क्विंटल भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला होता. राज्यभरासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातून वीरशैव समाज बांधव भाजीचा प्रसाद घेण्यासाठी दाखल झाले होते.

शिरडशहापूर येथून जवळ असलेल्या सारंगवाडी येथे डोंगरावर वीरशैव समाज बांधवांचे आराध्य दैवत असलेल्या सारंग स्वामी महाराज यांची यात्रा सुरू आहे. सारंग स्वामी महाराज यांनी घेतलेली संजीवनी समाधी व येथील उंच टेकडीवर त्यांचे समाधी मंदिर आहे. मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी होणाऱ्या या यात्रेला ५२९ वर्षाची वर्षाची परंपरा आहे.

या यात्रेत भाजीच्या प्रसादाचे विशेष महत्त्व आहे आणि ही भाजी सर्व दूर प्रसिद्ध आहे ही भाजी खाल्ल्याने वर्षभर रोगराई होत नाही, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हा भाजीच्या प्रसाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर येथे भाविक येत असतात. तसेच भाविक ही भाजी खाण्यासाठी सोबत पोळ्यासुद्धा घेऊन येतात. यावर्षी दोनशे क्विंटल भाजीचा प्रसाद करण्यात आला होता. यामध्ये भाजी कमिटी तसेच भाविकांनी भाजीपाल्यात वांगे, बटाटे, चवळी, टमाटे, गाजर, दोडके, कोथिंबीर, पालक, चुका, शेपू, मेथी, हरभरा, करडी, पान कोबी, फुलकोबी, हिरवी मिरची, सिमला मिरची, काकडी, मुळा, भोपळा, कांद्याची पात, ऊस आदी भाज्या आणून दिल्या. या सर्व भाज्या एका लोखंडी कढईत मिसळून त्यात गोडेतेल मसाला टाकून फोडणी देऊन भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला.

नंतर या भाजीच्या प्रसादाचे वाटप भाविकांना करण्यात आले. हजारो भाविकांनी रांगा लावून याचा लाभ घेतला.उज्वला तांभाळे यांच्याकडून सर्व भाविकांना पोळ्यांचे वाटप करण्यात आले. यात्रेसाठी चारचाकी, दुचाकी, तीन चाकी वाहने तसेच पायी देखील भाविक येथे आले होते. यात्रेसाठी परिवहन महामंडळाने विशेष बसची व्यवस्था केली होती. या यात्रेत विविध वस्तू विक्रीच्या दुकानासह धार्मिक पुस्तके धार्मिक साहित्य विक्रीचे दुकाने उभारण्यात आली होती. यात्रेमध्ये कीर्तन भजन व विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

भाविकांची मोठी वर्दळ व वाहनांनी हा परिसर गजबजुन गेला होता. पोलिसांनी यावेळेस चोख बंदोबस्त ठेवला होता. भाजीच्या प्रसादासाठी सारंग स्वामी यात्रा कमेटी, विश्वस्त कमेटी, वीरशैव समाज बांधव शिरड शहापूर सारंगवाडी गवलेवाडी गावातील गावकऱ्यांनी पुढाकार घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT