Choice-Number
Choice-Number 
मराठवाडा

चॉईस नंबरची वाढतेय क्रेझ

सुशांत सांगवे

लातूर - हौसेला कुठलेही मोल नसते, असे म्हटले जाते. त्यामुळेच कोणी हौसेपोटी तर कोणी श्रद्धेपोटी आपल्या नव्या वाहनांसाठी दहा हजार रुपयांपासून तब्बल तीन लाख रुपयांचे शुल्क भरून पसंती क्रमांक (चॉईस नंबर) घेत आहेत. लातुरातील वाहनचालकांमध्ये चॉईस नंबरची ही क्रेझ वाढत असल्याने प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होत आहे.

वाहन खरेदी केल्यानंतर प्रत्येकाला आपल्या आवडीचा किंवा सहज लक्षात राहावा, असा वाहन क्रमांक मिळावा असे वाटते. त्यामुळेच पैसे भरून चॉईस नंबर मिळविण्याची सुविधा आरटीओत उपलब्ध आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षात ९५६ जणांनी आपल्याला हवा असलेला नंबर मागवला. मात्र, त्यानंतर प्रमाण वाढत गेले. २०१७-१८ या आर्थिक वर्षात एक हजार ३०३ जणांनी तर २०१८-१९ या आर्थिक वर्षात एक हजार ३०९ जणांनी आरटीओतून पसंती क्रमांक मिळविला. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल आरटीओला प्राप्त झाला आहे.

 चालू वर्षात जानेवारीपासून मार्चअखेरपर्यंत ३२२ जणांनी आवडीच्या क्रमांकासाठी अर्ज केला होता. पसंती क्रमांकाचा हा आलेख वाढताना दिसत आहे. विशेषत: तरुणांमध्ये याची क्रेझ अधिक आहे. बुलेटसारख्या दुचाकींना आवर्जून पसंती क्रमांक घेतला जातो. महागड्या चारचाकी वाहनांसाठीसुद्धा पसंती क्रमांक मागवला जातो, अशी माहिती आरटीओ प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT