veterinary center
veterinary center  
मराठवाडा

पशुधन अधिकाऱ्यांच्या संपामुळे कळंबमधील पशुवैद्यकीय सेवा कोलमडली

दिलीप गंभीरे

कळंब (जि.उस्मानाबाद) : मागील दीड महिन्यापासून पशुधन अधिकाऱ्यांनी (Veterinary Officers Strike) आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. प्रशासनाकडून या मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे आता सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे असहकार कामबंद आंदोलनाला वेगळे वळण मिळाले असून पशुपालक, शेतकऱ्यांच्या (Farmer) गैरसोयीत अधिकच भर पडली आहे. यामुळे तालुक्यातील (Kalamb) पशुवैद्यकीय सेवा ठप्प झाली आहे. कोरोना संसर्गाच्या संकट काळात पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांनी अखंड सेवा दिली आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून काम केलेले असतानाही यांच्या (Osmanabad) विविध असलेल्या मागण्या प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. विविध मागण्यांसाठी गेल्या दीड महिन्यापासून संप पुकारण्यात आला आहे. अद्यापपर्यंत या मागण्याचा शासनाकडून विचार केलेला नाही. १५ जूनपासून काम बंद आंदोलन सुरू केले होते.

सदरील आंदोलन प्राथमिक स्वरूपात तीन टप्प्यांमध्ये करण्याच्या आयोजिले होते. त्या अनुषंगाने प्रथम टप्प्यात शासकीय सेवेतील पशुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी लसीकरण कृत्रिम रेतन तसेच इतर किरकोळ सेवा दिल्या आहेत. प्रलंबित मागण्यासाठी अनेक वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे.परंतु शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने असहकार काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. मागण्या मान्य होईपर्यत काम बंद आंदोलन सुरूच राहणार असल्याचे शासकीय व खासगी पशुधन संघटनेचे तालुकाध्यक्ष रवी ढवळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT