file photo 
मराठवाडा

आॅनलाईन शिक्षणाचा बळी : धानोरा काळे येथील गोदावरी पात्रात दहावीच्या विद्यार्थींनीची आत्महत्या

शिवाजी शिराळे

ताडकळस ( जिल्हा परभणी ) : अनेक गावात आजही भारनियमन असल्याने विजेअभावी व नेटवर्कमुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. या परिस्थितीत अभ्यास न झाल्याने अनेक विद्यार्थी परिक्षेत नापास होण्याच्या भीतीने चिंताग्रस्त बनले आहेत.

असाच प्रकार धानोरा काळे ( ता. पुर्णा ) येथील इयत्ता १० वीत शिक्षण घेणारी कोमल उध्दवराव पवार (वय १६) वर्षे या विद्यार्थींनीने आॅनलाईन प्रणालीद्वारे अभ्यास झाला नसल्याने परिक्षेत नापास होण्याच्या भीतीने शनिवार (ता. ३०) जानेवारी रोजी पहाटे गावालगत असलेल्या गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारुन आत्महत्या केली. 

ग्रामीण भागात गेल्या १० महिन्यांपासून कोरोना महामारीमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मोबाईलद्वारे आँनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण सुरु केले आहे. याच माध्यमातून अभ्यास देखील करीत आहेत. परंतु हे आँनलाईन अभ्यास करतांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

या प्रकरणी ताडकळस पोलिस ठाण्यात उध्दवराव विठ्ठलराव पवार यांनी दिलेल्या खबरीवरुन आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सहाय्यक पोलिस निीरक्षक विजय रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश लोंढे, श्री. काळे, पठाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन धानोरा काळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गिनगिने यांनी शवविच्छेदन केले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.  

संपादन - प्रल्हाद कांबळे   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा बदली? तुकाराम मुंढेंना पालक सचिव पदावरून हटवले, कुणाची वर्णी?

Madhuri Mahadevi Elephant Hearing : निराशा! ‘माधुरी’ हत्तीणीचा कोल्हापूर प्रवास आणखी लांबणार; आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं?

Sanjay Gandhi: ज्योतिषाने म्हटलेलं, संजयची जीवनरेषा छोटी आहे; चामुंडेच्या पुजाऱ्यानेही दिला होता इशारा, इंदिरा गांधी घाबरल्या...

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांची बदली, 'या' शहराच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी...

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्ह्याला पुढील चार दिवस ‘येलो’ अलर्ट

SCROLL FOR NEXT