Nanded News 
मराठवाडा

Video : १४४ कलमात दीडशहाणे पडले बाहेर, मग पोलिसांनी दाखवला इंगा

शिवचरण वावळे

नांदेड : ‘कोरोना’ व्हायरसच्या भितीने राज्यात जमावबंदी कायदा (कलम १४४) सोमवारी (ता.२३ मार्च २०२०) सकाळी पाच वाजेपासून लाग करण्यात आला. जमाव बंदीच्या भितीने तरी, नागरीकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणार नाहीत व ‘कोरोना’ व्हायरसला आळा घालणे शक्य होईल असे वाटत होते. परंतु, सोमवारी जमावबंदीचा आदेश झुगात नांदेड शहरातील काही अतिउत्साहित नागरीकांनी बिनधास्त रस्त्यावर स्वार होत कायद्याची पायमल्ली करुन स्वतःचा व दुसऱ्यांचा जिव धोक्यात घालत आहेत.

मंगळवारी (ता.३१ मार्च २०२०) पर्यंत जमावबंदीचा कायदा लागु करण्यात आला आहे. या दरम्यान कुणीही घराबाहेर पडु नये. तसेच अत्यावश्यक सेवा सुविधाच सुरु ठेवण्यात येणार आहे. असे असताना देखील काही अती उत्साही नागरीक बिनधास्तपणे रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणेला ‘या’ नागरीकांना हात जोडून समजावून सांगण्याची वेळ आली अहे. तरीही ते ऐकत नसल्याने पोलिसांना बळाचाही वापर करावा लागत आहे.

अतिउत्साही नागरीकांना पोलिस प्रशासनातील अधिकारी स्वतः रस्त्यावर थांबुन ‘‘आम्ही तुमच्यासाठीच आहोत. आता तरी सुधरा, स्वतःची काळजी घ्या. घरात बसा’’ असे सांगत आहेत. तरी देखील नागरीक रस्त्यावर गर्दी करत आहेत. खोटी कारणे सांगुन पोलिस प्रशासनाची दिशाभूल करत गाडीवर फिरत आहेत. विशेष म्हणजे नांदेडच्या रस्त्यावर फिरणारे बहुतेक नागरीक कुठलीही काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहेत. विना मास्क एकापेक्षा जास्त लोक बाईकवर बसून रस्त्याने फिरत आहेत.

हेही वाचा - जनता कर्फ्यू : पोलिसांचा चोख बंदोबस्त, एसपी मगर रस्त्यावर

नांदेड शहरात प्रवेश करण्यासाठी राजकॉर्न पासून ते वर्कशॉप, श्रीनगर, आयटीआय चौक, शिवाजीनगर, वजिराबाद, जुना मोंढा, बर्की चौक, सराफा बाजार असा हा एकमेव महत्वाचा आणि सर्वात वर्दळीचा रस्ता. परंतु पोलिस अधिकाऱ्यांनी सकाळी ११ पर्यंत रॉजकॉर्नवर कुठलिही बॅरीकेट्स लावलेले नव्हते. त्यामुळे छत्रपती चौक, तरोडा नाका आणि चैतन्यनगर विमानतळ रस्त्यावरुन थेट नागरीक शहरात प्रवेश करत होते. राजकॉर्नहून पुढे वर्कशॉपकडे किंवा श्रीनगर परिसरात नागरीकांना रोखण्यासाठी कुठेच आडकाठी केली जात नाही. त्यामुळे लोक पुढे कुच करुन शहरात पसरत आहेत. नको त्या ठिकाणी गर्दी करुन १४४ कलमाचे उल्लंघन करत आहेत. ऐनवेळी शहरात वाढलेली गर्दी रोखण्यासाठी पोलिसांनी थेट आयटीआय चौकात बॅरीकेट्स लावून गर्दी दुपारी १२ वाजता आटोक्यात आणली.

एसटी महामंडळाच्या कर्मशॉपमध्ये कर्मचारी कामावर
राज्य शासनाने सुरुवातीला शासकीय कार्यालयात अभ्यांगतांचीच नव्हे तर, कर्मचाऱ्यांमध्ये देखील दोन हाताचे समांतर अंतर राखता यावे म्हणून पन्नास टक्के कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली होती. त्यानंतर शासकीय कार्यालयात थेट पाच टक्के इतक्याच कर्मचाऱ्यांना एकेदिवशी कामावर बोलविले जात आहेत. हा नियम सर्व शासकीय व खासगी कार्यालय कंपनी यांना लागु आहे. यात एसटी महामंडळाचाही समावेश आहे. ३१ मार्च पर्यंत बससेवा बंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मात्र नांदेडच्या एसटी महामंडळातील वर्कशॉपमधील ८० ते ९० कर्मचारी विना मास्क एकाचवेळी वर्कशॉपमध्ये दाटीवाटीने काम करत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या कर्मचाऱ्यांना कायदा लागु केला नाही का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. शिवाय एसटी महामंडळातील वरिष्ठांच्या या भूमिकेवर खुद्द कामगार कर्मचारी संघटनाही नारीजी व्यक्त करत आहेत.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT