nadi 
मराठवाडा

Video ; रात्रीच्या दमदार पावसाने परभणी जिल्हा ओलाचिंब....

संजय मुंढे

सेलू ः तालुक्यात गुरुवारी (ता.नऊ) व शुक्रवारी (ता.दहा) झालेल्या जोरदार पावसाने हाहाकार माजला असून करपरा-दुधना नदीला पूर आला तर राजेवाडी गावाजवळील दुधना नदीच्या पुलावरून व रस्त्यावरील ओढ्या-नाल्यांना आलेल्या पुराने सेलू-वालूर रस्ता काही काळ बंद झाला होता. काही शिवरातील सोयाबीन-कापूस पिक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला असून शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच जिल्ह्यात सर्वच तालुक्यात या पावसाने हजेरी लावली. 

तालुक्यात बुधवारी (ता.आठ) रात्री काही ठिकाणी व दुसरा दिवशी गुरुवारी (ता.नऊ) रात्री नऊच्या सुमारास शहरासह तालुक्यातील वालूर, चिकलठाणा, देवगावफाटा, मोरेगाव, रायपुर, राव्हा, वाई, केमापुर, हातनुर, धामणगाव, देऊळगाव (गात), रवळगाव, कुपटा शिवरात मुसळधार पाऊस झाला. जवळपास रात्री दीड ते वाजेपर्यंत पाऊस पडल्याने शेतात पाणीच पाणी साचलेले सकाळी दिसले.
 
हेही वाचा - दिलासादायक; आठ योध्‍यांची कोरोनावर मात तर दोन नवे रुग्ण पॉझिटिव्ह -

शेत जमिनीवर पाण्याचा डोह 
काही भागातील शिवारात ढगफुटी झाल्यासरखा पाऊस पडल्याने शेत जमिनीवर पाण्याचा डोह साचून सोयाबीन, कापूस, तुर पिक पाण्याखाली गेले. अगोदरच सुरुवातीला पेरलेले सोयाबीन उगवलेच नसल्याने दुबार पेरणी करुन तुरळक उगवलेली सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्यामुळे पिवळे पडून जाते की काय असे चित्र आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडत असताना शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात विजेचा लंपडाव सुरू होता. काही भागातील विद्युत पुरवठा सकाळपर्यंत सुरळित झाला नसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. 

पुरामुळे निवळी धरण साठ्यात कमालीची वाढ
मुसळधार पाऊस झाल्याने तालुक्यातील करपरा,दुधना नदीला पूर आला.करपरा नदी दुधडी भरून गेल्याने नदीवरील निवळी धरणात पाण्याचा मोठ्या प्रमाणात ओघ सुरू झाला.या धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. परिसरातील राव्हा, पार्डी(कौसडी),मापा,कुडा, कोलदंडी, राजुरा, आडगाव(दराडे), निवळी आदी गावातील पाणीपुरवठा व शेतीसिंचनचा प्रश्न मिटला. धरणक्षेत्रातील गावांना मोठा फायदा होणार आहे.

सेलू - वालूर रस्ता बंद झाल्याने वाहतूक ठप्प
दुधना नदीला पूर आल्याने सेलू-वालूर रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सेलू-वालूर रस्त्यावरील राजेवाडी गावाजवळील दुधना नदीच्या पुलावरून पुराचे गेल्यामुळे सेलू-वालूर रस्त्यावरील वाहतूक शुक्रवारी (ता.दहा) सकाळी अकरा वाजेपर्यंत बंद झाली होती. सेलू-मोरेगाव मार्गे वालूर रस्त्यावर साळेगाव शिवारातील खडकी व हातनुर गावाच्या शिवारातील नाल्यांना पूर आल्याने या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 

झरी परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग
झरी ः गुरुवारी (ता.नऊ) रात्री अकराच्या सुमारास पावसाने परिसरात जोरदार बॅटिंग केली. सकाळी चार वाजेपर्यंत असल्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे. पावसामुळे शेतकरी अंतर्गत मशागती कामे करण्यात व्यस्त आहेत. सोयाबीन कोळपणी, मुग कोळपणी तसेच सोयाबीन तणनाशक मारणे या कामामुळे शेतकऱ्यांची जोरदार कामे चालू झाली आहेत तसेच कपाशीला कोळपणी करून मिलन सुरू करण्याच्या तयारीत आहेत. हा पाऊस झरी परिसरात ३४ मिलीमीटर झाल्यामुळे दुधना नदीत चांगल्या प्रकारे पाणी आले आहे. 

(संपादन ः राजन मंगरुळकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांना नारायण गडावर महापूजेचा मान; मराठा समाजाचा सन्मान!

गेटवर वाट बघत थांबलेला एकटा शूटर, ६ सेकंदात भाजप नेत्याची हत्या; CCTV फूटेज समोर

Latest Maharashtra News Updates : सहकार क्षेत्राला शैक्षणिक बळ देणारा ऐतिहासिक टप्पा : केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

SCROLL FOR NEXT