file photo 
मराठवाडा

व्हिडिओ : पोलिस हवालदार विठ्ठल कटारे यांची गाण्यातून जनजागृती

गणेश पांडे

परभणी : कोरोना संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी परभणी पोलिस दलातील पोलिस हवालदार विठ्ठल कटारे यांनी गाण्यातून  जनजागृती केली आहे. त्यांच्या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. या विपरीत परिस्थितीत पोलिस, डॉक्टर, परिचारिका व सफाई कामगारांचे कार्य मोठे आहे. पोलिस सातत्याने लोकांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. महिनाभरापासून वेगवेगळ्या पातळीवर पोलिसांनी हा उपक्रम सुरू केला आहे. परभणी शहरातील नवामोंढा पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असणारे विठ्ठल पंडितराव कटारे या पोलिस कर्मचाऱ्याने गाण्यातून जनजागृती सुरू केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य तसेच केंद्र शासन वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करीत आहेत. 

घरी थांबण्याचे आवाहन 
कोरोना विषाणूच्या या लढाईत डॉक्टरांप्रमाणेच पोलिसांचे योगदानदेखील मोठे आहे. डॉक्टर प्रत्यक्ष रुग्णांची सुश्रुषा करीत आहेत, तर पोलिस नागरिकांच्या सुरक्षिततेची जबबादारी पार पाडत आहेत. कधी कडक तर कधी विनंतीपूर्वक लोकांना सांगून घरी थांबण्याचे आवाहन केले जात आहे. अनेक पोलिस कर्मचारी वेगवेगळ्या पद्धतीने या लढाईत उतरले असून लोकांना जागृत करण्याचे काम करीत आहेत. 

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
परभणी शहरातील नवामोंढा पोलिस ठाण्याचे हवालदार विठ्ठल पंडितराव कटारे हे उत्तम गायक आहेत. त्यांनी अनेक कार्यक्रमांतून त्यांच्यातील गाण्याचे कौशल्य प्रदर्शित केले आहे. आता त्यात सुरेल आवाजाचा फायदा घेत श्री. कटारे यांनी कोरोना विषाणूसंदर्भात नागरिकांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी याची माहिती गाण्यातून दिली आहे. तसेच नागरिकांनी घराता उंबठा ओलांडू नयेत असे आवाहनही त्यांनी या गाण्यातून केले आहे. सध्या हे गाणे  सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का; ठाकरे गटाच्या बड्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

Selu Traveler Accident: ट्रॅव्हलरची टिप्परला मागून धडक; गुजरात येथील १७ प्रवासी जखमी; रमणा फाट्याजवळ अपघात

तापसीच्या एका वक्तव्याने कंगना भडकली? ‘सस्ती कॉपी’ म्हणत पुन्हा तापसीला डिवचलं! नंतर पोस्ट केली डिलीट

Crime: रस्त्याकडेला उभं राहून नागरिकांवर नको त्या कमेंट्स, जाब विचारताच मोठा वाद; तरुणांच्या हाणामारीत 65 वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू

Marathi News Live Updates : भारतीय रेल्वे आपल्या व्याप्ती, वेग आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर भारताचा आर्थिक भूगोल नव्याने घडवतेय

SCROLL FOR NEXT