Nanded Photo 
मराठवाडा

Video: लॉकडाऊन : गर्भवती मातांनो...काळजी नको, खबरदारी घेण्याची गरज

शिवचरण वावळे

नांदेड : जगभरातील ‘कोरोना’चे संकट बघता यात गर्भवती मातांना ‘कोरोना’ची लागण होण्याचे प्रमाण अगदी नगण्य असले तरी, जन्माला येणारे मुलदेखील ‘कोरोना’ मुक्त श्वास घेण्यात यशस्वी झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. परंतु, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. ज्या गर्भवती मातांचा नऊ महिण्याचा कालावधी पूर्ण झाला आहे किंवा दिवस पूर्ण झालेत. अशा गर्भवतीमातांनी घाबरुन न जाता ‘कोरोना’ची चाचणी अवश्य करुन घ्यावी, असे मत डॉ. वृषाली किन्हाळकर यांनी व्यक्त केले.

आरोग्य विभागाकडून नुकतेच एक परीपत्रक जारी करण्यात आले आहे. यात गर्भवतीमातांनी ‘कोरोना’ची चाचणी करुन घेण्यासंबंधी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्या सुचनांचे पालन केल्यास गर्भवतीमातांच्या आरोग्याची अधिक चांगल्यापणे काळजी घेणे सहज शक्य होईल.

‘कोरोना’ हा आजार सर्वांसाठी नवीनच आहे. यामुळे सतत धावणाऱ्या जगाला ‘कोरोना’रुपी गतीरोधक निर्माण झाल्याने ब्रेक बसला आहे. इतके दिवस जग ज्या झपाटलेल्या वेगाने धावत होते, ते संपूर्ण जग ‘कोरोना’च्या भीतीने घरातच ‘लॉकडाउन’ आहे. आरोग्यशास्त्रात पूर्वीपासून आजारी व्यक्तीस किंवा त्या व्यक्तीच्या ज्या अवयवास आजार झाला असेल त्या अवयवास डॉक्टर नेहमी आरामाचा सल्ला देतात. हे काही नवीन नाही. मात्र, ‘कोरोना’ हा आपल्या सर्वांसाठी नवा आहे. तो अदृष्य आहे. तो कुठेच दिसत नाही. तरी देखील मानवाला बाधीत करतो. एकापासून दुसऱ्याला होतो. म्हणून प्रत्येकाने घरात राहुन आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यायची आहे.

हेही वाचा - ध्येय वेड्या गुरूजींची डिजीटल शाळा...! कुठली ती वाचा

गर्भवती माता जेव्हा बाळाला जन्म देते, तेव्हा तिच्या शरीराची झिज झालेली असते. रक्तस्त्राव झालेला असतो, यामुळे पुढील दीड महिणा तिची शक्ती कमी झालेली असते. या दरम्यान तिला चांगला आहार देण्याइतकेच तिला इतरांचा त्रास होणार नाही, हे महत्वाचे. म्हणून त्या मातेस आणि बालकास स्वंतत्र द्या, तिच्याभोवती नातेवाईकांची गर्दी होणार नाही. याची घरातील सर्वांनी खबरदारी घ्यावी. तिला सहज पचन होईल असा आहार द्यावा, तिच्या रुमची स्वच्छता पाळावी, बाळ व त्या आईची काळजी घेणारी एकच व्यक्ती असावी, बाळाची त्वचा देखील नाजूक असते त्यामुळे त्याला सुद्धा हात लावताना हात स्वच्छ धुवूनच त्या खोलीत प्रवेश करावा.

हे करावे...

  • गर्भधारणेच्या काळात त्या गर्भवतीने छान छान गोष्टींची पुस्तकांचे वाचान करावे.
  • सकारात्मक विचार करावा.
  • नियमित व्यायाम, सकस आहार घ्यावा.
  • आवडीचे पुस्तक वाचन किंवा इतर कामे करावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकमध्ये खळबळ! आश्रम शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Tamil Nadu Reservation Case : मुख्यमंत्री विजय इस्लाम स्वीकारणाऱ्यांसाठी आरक्षण देण्याच्या बाजूने, तामिळनाडू सरकारची सुप्रीम कोर्टात धाव

Latest Marathi News Live Update : मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीत बचावकार्य अद्यापही सुरुच

Gold Rate Today: सोनं 5 हजारांनी महागलं! सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ; मुंबई-पुण्यात 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचा भाव किती?

Alcohol Flavour Violation : रम, ब्रँडी, व्हिस्की, वाईन, बिअरच्या फ्लेवरमध्ये भेसळ; अन्न सुरक्षा विभागाची कारवाई, तुकाराम मुंडेंनंतर केंद्र प्रशासन जागे

SCROLL FOR NEXT