photo 
मराठवाडा

VIDEO-मूर्तिकलाच बनली उपजीविकेचे साधन

शिवाजी गिरी

केंद्रा बुद्रुक (जि. हिंगोली): सेनगाव तालुक्‍यातील केंद्रा बु. येथे तांबे, पितळेच्या टाकावू भांड्यांपासून देवदेवता, महापुरुषांच्या मूर्तींसह विविध प्राण्यांच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. लातूर येथील एक दाम्पत्य आकर्षक मूर्ती बनवून देत असून ही कला पाहण्यासाठी ग्रामस्थ गर्दी करीत आहेत.

लातूर येथील पाशुमियॉं व त्‍यांच्या पत्‍नी हे दोन दिवसांपासून रिसोड येथे वास्तव्याला आले आहेत. ते पितळ, तांबे, जर्मन भांड्यांपासून विविध मूर्ती तयार करतात. दोन दिवसांपासून ते केंद्रा बुद्रुक येथे सकाळीच दुचाकीवर येत आहेत. दुपारपर्यंत गावात थांबून मूर्ती तयार करून देत आहेत. दिवसभरात खर्च वजा जाता एक हजार ते बाराशे रुपये मजुरी त्‍यांना मिळत आहेत. पाशुमियॉं यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असून त्यांनीदेखील ही कला आत्मसात केली आहे.


टाकावू भांड्यांपासून मूर्ती

एका ठिकाणी हा व्यवसाय चालत नसल्याने त्‍यांना गावोगाव भटकंती करावी लागत आहे. ही कलाच आता उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. यावरच कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो. तांबे, पितळ व जर्मनच्या जुन्या टाकावू भांड्यांपासून मूर्ती तयार करीत आहेत. बाजारात पितळ, तांबे, जर्मनच्या मूर्ती विकत घ्यायच्या तर हजारो रुपये किंमत आहे. त्यामुळे ग्रामस्थही टाकावू भांड्यांपासून मूर्ती बनवून घेत आहेत. विविध देवदेवता, महापुरुषांच्या मूर्ती, विविध प्राण्यांच्या मूर्ती बनवून घेताना ग्रामस्थ दिसून येत होते.

 

हेही वाचा...आजपासुन होट्टल महोत्सव; काय आहे महत्व ते वाचा


अशी तयार करतात मूर्ती

मूर्ती तयार करताना पितळेचे भांडे भात्यावर गरम करून त्यात रासायनिक क्रिया करून त्‍याचे पाणी केले जाते. एका भांड्यात लाल रंगाची मऊ माती टाकून त्‍यात मूर्तीचे साचे ठेवले जातात. त्यामध्ये भांड्याचे तयार केलेले पाणी एका छिद्रातून साच्यात टाकले जाते. त्यानंतर साचावरील माती व्यवस्थित केली जाते. त्यानंतर ही माती बाजूला करून तयार झालेली मूर्ती बाहेर काढली जाते. या साचातून अवघ्या काही मिनिटांच मूर्ती तयार होते.

हेही वाचा...साई जन्मभूमीचा विकास हवा, त्यावर वाद नको ​

बाराशे रुपये मिळते मजुरी

एक मूर्ती तयार करण्यासाठी पन्नास रुपये मजुरी घेतली जाते. दिवसभरात वीस ते पंचवीस मूर्ती तयार केल्या जाताहेत. खर्चवजा जाता एक हजार ते बाराशे रुपये मजुरी मिळत असल्याचे पाशुमियॉं यांनी सांगितले. हा व्यवसाय एका गावात अधिक दिवस चालत नसल्याने त्‍यांना गावोगाव जावून ही कामे करावी लागताहेत. मुलांना घरी आजी, आजोबा व मोठ्या व्यक्तींजवळ ठेवून कामासाठी भटकंती करावी लागत असल्याचेही ते म्हणाले.

गोवागाव भटकंती

वडिलोपार्जित चालत आलेली कला पुढे मी जोपासली. आता ही कलाच आमच्या उदरनिर्वाहाचे साधन बनली आहे. मात्र, यासाठी गोवागाव भटकंती करावी लागते. मात्र, कलेनेच जीवनाला आधार दिला आहे.
-पाशुमियॉं लातूरवाले

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT