file photo 
मराठवाडा

Video ः जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक काय म्हणाले... नांदेडकरांनो जरुर पहा...

अभय कुळकजाईकर

नांदेड - शहरातील पिरबुऱ्हानगर भागात कोरोनाचा रुग्ण बुधवारी (ता. २२) आढळून आल्यामुळे सर्वांनाच सतर्क रहावे लागणार आहे. त्यामुळे नांदेडकरांनो घाबरु नका, मात्र सावध राहा...प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने आणि पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे. 

कोरोनाबाधीत व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंगचे) पालन करावे, वारंवार हात स्वच्छ धुवावे, अत्यावश्यक कामांसाठी बाहेर पडतांना मास्क किंवा स्वच्छ धुतलेल्या रुमालाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

नागरिकांच्या हालचालीवर बंधने
महिनाभरापासून ‘ग्रीन झोन’मध्ये असलेल्या नांदेड जिल्ह्यात आता कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. नांदेड महापालिका हद्दीत पिरबुऱ्हाणनगरला कोव्हीड - १९ चा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता नियमानुसार पिरबुऱ्हाणनगर व लगतचा परिसर सहयोगनगर, अशोकनगर, भाग्यनगर, वृंदावन कॉलनी, उदयनगर, शास्त्रीनगर, टिळकनगर, विद्युतनगर, अंबेकरनगर व इंदिरानगर या क्षेत्रामध्ये रोगाचा इतरत्र प्रसार होऊ नये, म्हणून हे क्षेत्र कन्टेनमेंट झोन (Containmet Zone) म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तेथील नागरिकांच्या हालचालीवर बंधने घालण्यात आली आहेत. 

‘मास्क’ नसेल तर होणार दंड 
जाहिर करण्यात आलेल्या कन्टेनमेंट झोनमध्ये कोणत्याही नागरिकांने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांमध्ये नमुद केल्यानुसार अत्यावश्यक कामाशिवाय, वैध कागदपत्राशिवाय व आवश्यक कारणाशिवाय तसेच मास्क न घालता बाहेर निघाल्यास त्यांच्या विरुद्ध दंडनीय कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
कन्टेनमेंट झोनमधील दहा हजार नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून यापुढे महापालिकेच्या यंत्रणेमार्फत १४ दिवस तपासणी करण्यात येणार आहे. 

दोन दवाखाने सील, डॉक्टर, कर्मचारीही क्वारंटाईन 
हा परिसर सील करण्यात आला असून आरोग्य आणि पोलिस विभागातर्फे खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी देखील आता आपआपल्या घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करावे. कारण आता लॉकडाउन आणखी कडक करण्यात येणार आहे. रुग्ण चांगला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आरोग्य विभाग काळजी घेत आहे. तसेच कोरोना बाधीत व्यक्तीने खासगी दवाखान्यामध्ये तपासणी केल्यामुळे तेथील दोन दवाखान्यातील डॉक्टरांना व तेथील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सदर दोन्ही दवाखाने सील करण्यात आले आहेत. जनतेने घाबरुन न जाता, घरातच राहून कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT