Maratha Reservation Protest 
मराठवाडा

Maratha Reservation Protest: मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या; विजय वडेट्टीवारांचे मोठे विधान, आंदोलकांची घेतली भेट

Sandip Kapde

Maratha Reservation Protest: काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अंतरवलीत मराठा आंदोलकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, ही भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

विजय वडेट्टीवार म्हणाले, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडत आहे. लोकसभेत विशेष अधिवेशनात कायदा करा आणि मराठा आरक्षण द्या. मराठवाड्यातील मराठा समाज ओबीसी होता. ४ महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत मसूदा ठरला होता की कुणबी म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यावा, त्यावेळी पुरावे मागण्यात आले. त्यानंतर एकही मिटींग झाली नाही.

महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, ही माझी भूमिका आहे. ही भूमिका असताना आरक्षणाची मर्यादा देखील वाढवली पाहीजे. काल झालेला गोळीबार आणि लाठीचार्ज मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार होता. तुमच्या प्रकृतीची तुम्ही काळजी घ्यावी. मराठा समाजाच्या लढाईला माझा आणि पक्षाचा पाठिंबा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

मी राज्यपालांना विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करतो. आरक्षण देणे सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे. राज्याचे मुख्यंमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री इथं आले असते. तर प्रश्न सुटला असता. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला माझा पूर्ण पाठिंबा आहे. ओबीसी समाज ५२ टक्के आहे. ओबीसमधून आरक्षण देण्याची भूमिका घेत असताना शिंदे-फडणवीस-पवार सरकारने आरक्षण वाढवून देण्याचा निर्णय संसदेत करावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT