jalkot jalkot
मराठवाडा

जळकोटात भरली 'विकेल ते पिकेल' अंतर्गत हळद पिक शेती शाळा

ही शेतीशाळा होकर्णा येथील उत्तम भुरे यांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आली

विवेक पोतदार

जळकोट (लातूर): तालुका कृषी विभाग व आत्मा मार्फत विकेल ते पिकेल अंतर्गत वांजरवाडा (ता.जळकोट) शिवारात हळद शेतीशाळा घेण्यात आली. त्यास सोमवारी (ता.५) शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. प्रसंगी तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिलाश क्षीरसागर ,कृषी सहाय्यक विशाल इंगळे, कृषी मित्र संभाजी मोरे आदि उपस्थित होते.

ही शेतीशाळा होकर्णा येथील उत्तम भुरे यांच्या प्रक्षेत्रावर घेण्यात आली. या प्रसंगी आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिलाष क्षीरसागर यांनी हळद पिकाला माती लावणे व ठिबक व्यवस्थापन याविषयी तसेच शेतीशाळा संकल्पना उद्देश, महत्त्व व शेतीशाळा रूपरेषा याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.

कृषी सहाय्यक विशाल इंगळे यांनी हळद पिकातील खत व्यवस्थापन व तण व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. तर तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हळद व मार्केट व्यवस्थापना तसेच हळद प्रक्रिया युनिट या याविषयी हळद उत्पादक शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी हळद उत्पादक शेतकरी अच्युत आगलावे, नागनाथ टेकाळे, उत्तम भुरे, मल्लिकार्जुन भुरे, रामेश्वर टेकाळे, शिवाजी भोंग, प्रकाश पवार आदि शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT