Manoj Jarange 
मराठवाडा

Manoj Jarange: अंतरवली सराटीच्या ग्रामस्थांच्या निवेदनाची दखल; जरांगेंच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Manoj Jarange Patil Hunger Strike: मनोज जरांगे यांचे उपोषण शनिवारपासून सुरू होणार आहे.पण, जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.

कार्तिक पुजारी

जालना- मनोज जरांगे यांचे उपोषण शनिवारपासून सुरू होणार आहे.पण, जरांगे यांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. अंतरवली सराटी आणि आजूबाजूच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यास परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती. याची दखल पोलिसांनी घेतली असून जरांगेंच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे.

जातीय सलोखा आणि शाळा-रहदारीला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुलं आणि महिलांना त्रास होतो, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं होतं की, गावातील जातीय सलोखा बिघडत असल्याने याला परवानगी देऊ नये. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतलीये. पोलिसांनी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे.

सगे-सोयरे यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत. याआधीच त्यांनी उपोषणाला बसणार असल्याचं ठरवलं होतं. पण, लोकसभेमध्ये राज्यात आचारसंहिता लागली असल्याने त्यांना आंदोलन करता आलं नाही. त्यांनी ८ जून रोजी उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली होती. सरकार मनोज जरांगे पाटील यांची कशी मनधरणी करतं हे पाहावं लागणार आहे.

अंतरवली सराटी गावातील ग्रामस्थांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला विरोध केला आहे. जरांगेंच्या उपोषणामुळे गावात मोठे गर्दी होते, याशिवाय जातीय सलोख बिगडतो. त्यामुळे त्यांना उपोषण करण्यापासून रोखावं अशी विनंती ग्रामस्थांनी ३ जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं.

आता पोलिसांनी त्यांना उपोषणाला परवानगी नाकारली असली तरी मनोज जरांगे उपोषण घेण्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जरांगे पाटील उद्या गावात उपोषणाला बसले तर पोलीस कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT