Iftar pangat
Iftar pangat Sakal
मराठवाडा

केंद्रा बुद्रुक येथील गावकऱ्यांनी मुस्लिम बांधवांसाठी केले इफ्तार पंगतीचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली - मशिदीवरील भोंग्यांवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यभर वाद सुरू आहे. परंतु, या वादाला फाटा देत सामाजिक सलोखा जपण्यात आला आहे. जिल्ह्यातील केंद्रा बुद्रुक, ता. सेनगाव येथील हिंदू बांधवांनी विठ्ठल रुख्मिनी मंदिरामध्ये रोजा धरणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी सोमवारी ता. १८ इफ्तार पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराच्या सभामंडपात मुस्लिम बांधवांसाठी रोजा सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सामाजिक सलोखा जपणाऱ्या गावच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.  केंद्रा बुद्रचक येथे सोमवारी पवित्र रमजानच्या महिन्यात रोजा असणाऱ्या मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पंगतीचे आयोजन करून धार्मिक विद्वेषाला गावकरी कधीच बळी पडणार नाही, असा संदेशच देण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यात केंद्रा बुद्रुक गाव विधायक कामांमध्ये नेहमीच अग्रेसर असते. गेल्या ३८ वर्षांपासून गावात एक गाव एक गणपती,ही परंपरा कायम आहे. या उत्साहात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात. गावातील प्रत्येक हिंदू सण-समारंभात मुस्लिम बांधवही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. शिवाय अखंड हरिनाम सप्ताहाच्या आजोनामध्येही मुस्लिम बांधवांकडून सहभाग घेतला जात असतो. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. परंतु, यामुळे कायदा सुव्यवस्थेबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच केंद्रा बुद्रुक येथील हिंदू गावकऱ्यांनी रमजानच्या रोजेदारांसाठी इफ्तार पंगतीचे आयोजन करून गावकऱ्यांनी सणसणीत चपराक देत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल पतंगे, शिवाजीराव सरनाईक,दिपक सरनाईक शिवराज सरनाईक, नारायणराव केंद्रेकर,अक्त्तर शेख, सज्जू शहा,प्रकाश डांगे, राजेश खंदारे, यांनी पुढाकार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT