vinayakrao patil health condition update Sakal
मराठवाडा

विनायकराव पाटील यांची प्रकृती खालावली; हैद्राबाद गॅझेट स्विकारुन आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषणाचा पाचवा दिवस

मराठवाड्यातील मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट स्वीकारून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कायकर्ते विनायकराव पाटील यांनी कवठा येथे अमरण उपोषण सुरू केले.

अविनाश काळे,

उमरगा : मराठवाड्यातील मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट स्वीकारून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कायकर्ते विनायकराव पाटील यांनी कवठा येथे अमरण उपोषण सुरू केले. त्यांच्या उपोषणाचा आज बुधवारी (ता. १४) पाचवा दिवस असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती चव्हाण यांनी दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी १० फेब्रुवारी पासून अमरण उपोषण सुरु केले आहे, जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी व मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे या एकमेव न्याय मागणीसाठी पाटील यांनी अन्न, पाणी त्याग उपोषण सुरु केले आहे.

बुधवारी उपविभागीय अधिकारी प्रियवंदा म्हाडदळकर व तहसिलदार गोविंद येरमे यांनी त्यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली मात्र त्यांनी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान आज दुपारी चार वाजेच्या सुमारास नाईचाकूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. स्वाती चव्हाण यांनी त्यांची वैद्यकिय तपासणी केली. त्यांच्या रक्तातील क्रिटॉण वाढले असून रक्तदाब वाढल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांची या अगोदर अँजोग्राफी झाल्याने त्यांच्यावर तात्काळ वैद्यकिय उपचार करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. उपोषण कालावधी दरम्यान ग्रामस्थ , परिसरातील सामाजिक व विविध शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी उपोषण मागे घेण्याबाबत विनंती केली असता त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. उपोषणाच्या आजच्या पाचव्या दिवसापर्यंत त्यांनी अन्न पाणी औषध गोळ्या वर्ज्य केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली असल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT