Violation of curfew
Violation of curfew 
मराठवाडा

Lockdown : दुचाकी, खासगी वाहने बिनबोभाट रस्त्यावरच

उमेश वाघमारे

जालना - लॉकडाऊनमध्ये जालन्यात दुचाकी, खासगी वाहनधारकांचा मुक्तसंचार सुरू असल्याचे चित्र आहे. परिणामी, पोलिस प्रशासनावर ताण पडत आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासनाने बिनबोभाट फिरणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करणे गरज आहे. 

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन लागू केले आहे; मात्र जालन्यात मागील आठ दिवसांपासून जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली शहरातील रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी खासगी वाहनांची वर्दळ सुरूच आहे. रस्त्यावरील दुचाकी आणि खासगी वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी जिल्ह्याधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दुचाकी व खासगी वाहनांचा इंधन पुरवठा खंडित करण्याचे आदेश पेट्रोलपंपधारकांना दिले होते. त्यामुळे रस्त्यावरील दुचाकी आणि खासगी वाहनांची वर्दळ कमी होईल, अशी अपेक्षा होती; मात्र अद्यापही शहरात दुचाकी आणि खासगी वाहने रस्त्यांवर बिनबोभाट धावत आहेत.

परिणामी, आता रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी आणि खासगी वाहने रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाईची पावले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे आता रस्त्यावर बिनबोभाट धावणाऱ्या दुचाकी आणि खासगी वाहनांविरोधात जिल्हाधिकारी कारवाईचे आदेश देतात की नाही, याकडे लक्ष लागले आहे. 

अशी घ्या काळजी 

  • घरी राहा. घरी आलेल्या अभ्यागतांना भेटणे टाळा. जर भेटणे आवश्यक असल्यास, किमान एक मीटर अंतर राखून भेटावे. 
  • आपले हात आणि चेहरा साबणाने आणि पाण्याने धुवावा. 
  • खोकताना आपल्या हाताच्या कोपऱ्याचा किंवा टिश्‍यू पेपर/रुमाल यांचा वापर करा. 
  • खोकला किंवा शिंकल्यानंतर टिश्यू पेपरची विल्हेवाट लावावी. हातरुमाल धुवून घ्या. 
  • योग्य पोषण आहारासाठी घरी शिजवलेले ताजे गरम जेवण करावे. सतत पाणी प्यावे, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ताज्या फळांचा रस घ्यावा. 
  • व्यायाम आणि ध्यान करावे. 
  • डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे नियमितपणे घ्यावीत. 
  • आपल्या कुटुंबातील सदस्यांशी (तुमच्याबरोबर राहत नसलेल्या), नातेवाईक आणि मित्रांशी कॉलद्वारे किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलावे. आवश्यक असल्यास कुटुंबातील सदस्यांची मदत घ्यावी. 
  • मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा गुडघा बदलण्यासारख्या आपल्या शस्त्रक्रिया करणे (नियोजित असल्यास) पुढे ढकलावे. 
  • आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवावे. आपल्याला ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तत्काळ जवळच्या आरोग्य सेवा सुविधेशी संपर्क साधावा आणि वैद्यकीय सल्ल्याचे अनुसरण करावे. 
  • आपल्या उघड्या हातात किंवा आपला चेहरा झाकल्याशिवाय खोकू किंवा शिंकू नका. 
  • जर आपल्याला ताप आणि खोकला येत असेल तर आपल्या संपर्कातील लोकांजवळ जाऊ नका. 
  • आपले डोळे, चेहरा, नाक आणि जिभेला स्पर्श करू नका. 
  • स्वत:च्या मनाने औषधोपचार करू नका. 
  • आपल्या मित्रांना आणि जवळच्या लोकांसोबत हस्तांदोलन करू नका अथवा आलिंगन देऊ नका. 
  • नियमित तपासणीसाठी किंवा पुनर्तपासणी करण्यासाठी रुग्णालयात जाऊ नका. शक्यतो आपल्या आरोग्य सेवा प्रदात्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मार्गदर्शन घ्या. 
  • उद्याने, बाजारपेठ आणि धार्मिक स्थळांसारख्या गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. 
  • अत्यंत आवश्यक नसल्यास बाहेर जाऊ नका. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT