File Photo 
मराठवाडा

नांदेडच्या ‘त्या’ २५ जणांच्या स्वॅब अहवालाची प्रतीक्षा लांबली

शिवचरण वावळे

नांदेड - नांदेड जिल्ह्यातून २५ संशयितांच्या घशातील लाळेचे (स्वॅब) नमुने गुरुवारी (ता. नऊ) औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. शनिवारी (ता. दहा) सायंकाळपर्यंत सर्वांचे अहवाल प्राप्त होणे अपेक्षित होते. मात्र, औरंगाबाद येथील प्रयोग शाळेतील ‘कोरोना’ टेस्टींग किटस् संपल्याने त्या पंचवीस संशयितांच्या अहवालाची प्रतिक्षा दोन दिवस लांबणीवर पडली आहे.
 
पूर्वी कोरोना संशयितांच्या ‘स्वॅब’ची तपासणी पुणे येथील प्रयोगशाळेत होत असे. नांदेड ते पुणे हे दहा तासाचे अंतर असल्यामुळे अहवाल येण्यास किमान दोन दिवस तरी वाट बघावी लागत असे. दोन दिवसाचा हा अवधी कमी व्हावा, म्हणून पुण्याऐवजी औरंगाबाद आणि सोलापूर येथील प्रयोगशाळेत ‘कोरोना’ स्वॅब चाचणी लॅब सुरु करण्यात आली आहे. यामुळे काही दिवसापासून नांदेडचे सर्व स्वॅब औरंगाबाद किंवा सोलापूर अशा दोन ठिकाणी तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. मात्र, गुरुवारपासून (ता. नऊ) औरंगाबादच्या लॅबमधील ‘कोरोना’ टेस्टींग किटस् संपल्याने गुरुवारी (ता. नऊ) पाठविलेले अहवालाची प्रतिक्षा दोन दिवसांनी लांबली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.    

हेही वाचा- Video : नांदेडकरांच्या आरोग्यासाठी पोलिसांची कसरत
अहवालाची प्रतिक्षा कायम

गुरुवारी पाठविण्यात आलेल्या २५ जणांचे स्वॅब अहवाल प्राप्त झाले नसले तरी, शुक्रवारी (ता. दहा) पुन्हा ११ संशयितांच्या लाळेचे ‘स्वॅब’ तपासणीसाठी औरंगाबादला पाठविण्यात आले आहेत. त्या सर्व अहवालाची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा कायम आहे.


सर्व अहवाल निगेटिव्ह प्राप्त होतील हिच अपेक्षा
गुरुवारी पाठविलेल्या २५ जणांचे स्वॅब अहवाल प्राप्त होण्यास अजून दोन दिवस लागतील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आम्ही विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्याकडे तक्रार केली आहे. सर्वच्या सर्व स्वॅबचे अहवाल लवकरात लवकर प्राप्त होतील आणि ते सर्व अहवाल निगेटिव्ह असतील, अशी आशा आहे.
- डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET & TET Exam : ‘नीट’ आणि ‘टीईटी’ एकाच दिवशी! दोन्ही परीक्षांचे केंद्र एकच; हजारो विद्यार्थी पून्हा संभ्रमाच्या वातावरणात

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्स, गतविजेत्या RCBच्या ताफ्यात बदल! प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी 'हे' डाव यशस्वी ठरणार की...?

Pune Bomb Case: यूट्यूबवरून बॉम्ब बनवायला शिकला, फक्त ४०० रुपयांत उडवली पुण्याची झोप; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Pune Nashik Railway Issue : ‘रेल्वे’ मंचरला पोहोचली; पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न पुन्हा चर्चेत

Sand Theft : रात्रीस खेळ चाले नव्हे.... दिवसा-ढवळ्या बोटीद्वारे; वाळूचा उपसा, अन् टिप्परने वाहतूक, एका ट्रॅक्टरवरती कारवाई

SCROLL FOR NEXT