घुमान यात्रा  
मराठवाडा

‘ या ’ यात्रेचे जंगी स्वागत 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : 'नानक साई' फाऊंडेशनची सहावी संत नामदेव घुमान सद्भावना यात्रा शनिवारी (ता. नऊ) नोव्हेंबर रोजी नामदेवनगरी घुमानमध्ये दाखल झाली. ही यात्रा संत नामदेव महाराज यांच्या जन्मोत्सवात सहभागी झाली. नामदेवांच्या समाधीपुढे नतमस्तक झाली. यात्रेचे घुमाननगरीने अभूतपूर्व असे स्वागत केले.

शिख पंथाचे संस्थापक श्री गुरू नानक देवजी यांच्या ५५० व्या गुरुपुरब व संत नामदेव महाराज यांच्या ७४९ व्या जन्म दिनाच्या निमित्ताने समर्पित ही घुमान सद्भावना यात्रा आयोजित करण्यात आली आहे. यात्रेत नांदेडसह महाराष्ट्र, तेलंगणा, तामिळनाडू राज्यातील २३१ भाविक सहभागी झालेले आहेत.

नांदेड भूषण संत बाबा नरेन्द्रसिंघ आणि संत बाबा बलविंदरसिंघजी यांचा कृपाआशीर्वाद लाभलेली ही यात्रा ता. तीन नोव्हेंबरला सुरू झाली असून दिल्ली, पानिपत, कुरुक्षेत्र, फतेहगड, माता नैनादेवी, आनंदपूर साहिब, भाकरानांगल धरण, कार्तिकी स्वामी, अमृतसर साहिब, अटारी वाघा बॉर्डर, सुल्तानपूर, लोहडी आदी ठिकाणी भेट देत १२ नोव्हेंबर रोजी विशेष रेल्वेने सचखंड नगरीला परतणार आहे. 

जेष्ठ पत्रकार तथा नानक साई फाउंडेशनचे चेअरमन पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतृत्वाखाली घुमान यात्रेचे नियोजन केलेले आहे. पंजाब आणि महाराष्ट्रमध्ये बंधू भाव निर्माण करणे आणि सांस्कृतिक संबंध मजबूत करणे हा या यात्रेचा उद्देश सफल होताना दिसतोय. घुमानसह पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, ग्वालेर, हिंगोली, अकोला, पाणीपत, रोपड, कुरुक्षेत्र, परजिया कलान येथे यात्रेचे भव्यदिव्य असे अभूतपूर्व स्वागत झाले. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटी, दिल्ली शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटी व सरबत दा भला सेवा ट्रस्टने यात्रेचे स्वागत केले, ट्रस्टचे प्रधान सरदार जसासिंघ संधु उपस्थित होते. यात्रेत बोकारेसह संत नामदेव घुमान यात्रा समितीचे अध्यक्ष विलास पडवळ, सुधाकर पिलगुंडे, चरणसिंघ पवार, प्रफुला बोकारे, गंगाधर पांचाळ, प्रा. राजेश मुखेडकर, बी. पी. माने, पुंडलिक बेलकर, मारोतराव शिंदे मानाठकर, अशोक दालपे, तुकाराम कोटूरवार, अनिल अंबेकर, राजेश रापते, विश्वनाथ शेटे, बालाजी ढगे,  प्रा. दत्तात्रय बचाटे, दिगंबर गायकवाड, सुदर्शन रापतवार, चंद्रकांत पोतदार, डी. के. पाटिल, अमोल दुर्गे, श्रेयश बोकारे, रामराव मिजगर, मालिकार्जुन पाखंडे, जयसिंग शिंदे, जयराम कापुरे, रमेश मिरजकर, नारायण वाकोडे, तुकाराम पाटील, सदानंद सुपेकर, शिवाजी वाघ, शीवाजी जाधव, प्रभाकर लोखंडे यांच्यासह २३१ जण सहभागी झाले आहेत. आज ही यात्रा अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जाऊन नतमस्तक होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT