आमदार नवघरे sakal
मराठवाडा

वसमत : ३१४ हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली

वसमत तालुक्यातील १९ गावांतील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मंजुरी

संजय बर्दापुरे

वसमत : तालुक्यातील १९ गावांतील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. यामुळे ३१४ हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. तालुक्यातून वाहणाऱ्या नदीवर कोल्हापुरी बंधारे बांधून पाणी साठवण केल्यास सिंचनास त्याचा फायदा होऊन विकास साधता येईल, हा संकल्प आमदार नवघरे यांनी करुन मागील दीड वर्षांपासून मंत्रालयात संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरु ठेवला. मापदंडातील दुरुस्ती नंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार व मृद व जलसंधारण विभागाने वसमत तालुक्यातील १९ गावांतील कोल्हापुरी बंधाऱ्यांना मंजुरी दिली आहे. तसेच याबाबत आदेश पारीत केले आहेत. यामुळे १४०३.४६ स.घ.मी. पाणीसाठा तयार होऊन तालुक्यातील ३१४ हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

मंजुरी मिळालेल्या गावांमध्ये विरेगाव, बळेगाव, खंदारबन, अरळ १, अरळ २, किन्होळा, हट्टा घामोडी नदी, इंजनगाव/पळसगाव, कुरुंदा, गुंज, टाकळगाव, कौठा, माळवटा, बोराळा, सोमठाणा, खाजमापुरवाडी, खांडेगाव, खंदारबन या गावांचा समावेश आहे. तसेच औंढा तालुक्यातील दौडगाव या गावाचाही समावेश आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित बंधाऱ्यांच्या पूर्णत्वानंतर त्या-त्या परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व पर्यायाने तालुक्याच्या विकासाला वेग येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police Bharti: पुणे शहर पोलिस दलात मेगा भरती! दोन हजार जागांसाठी दोन लाख अर्ज

Dimbha Dam Notice : डिंभा धरणातील आदिवासींना जलसंपदा विभागाची नोटीस; राष्ट्रवादीने दिला आंदोलनाचा इशारा!

Latest Marathi News Live Update : मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील ऑनलाईन ई-निविदा प्रक्रियेची घोषणा

T20 सामन्यात ड्रामा! पूरनने स्टंपिंगच केलं नाही, मग फलंदाजच स्वत:च रिटायर्ड आऊट; अखेर Mumbai Indians च्या टीमचा १ रनने पराभव

Viral Video: 'सोशल मीडिया'वर टास्क; गायीला खाऊ घातलं चिकन, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी झोडपून काढला

SCROLL FOR NEXT