आमदार नवघरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी sakal
मराठवाडा

वसमत : नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या

आमदार नवघरे यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

वसमत : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्याने तालुक्यातील अनेक गावांना फटका बसला. केळी पिकासह इतर शेतीपिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आमदार राजू नवघरे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवारी (ता.९) भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली.

वसमत तालुक्यातील गिरगाव, कुरुंदा मंडळासह दाभाडी, सोमठाणा, कानोसा, खाजमापुरवाडी, बगल पार्डी, परजना यासह जवळपास १५ ते २० गावांतील परिसरात बुधवारी (ता. आठ) सायंकाळी अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने थैमान घातले होते. यात पिकांची नासधूस होऊन झाडेही कोसळली आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या गुराढोरांचेही बळी गेले आहेत. अनेक घरे कोसळली असून, विजेचे खांबही मोडले आहेत. विशेष म्हणजे हाताशी आलेली केळीचे पीक जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. याची माहिती मिळताच आमदार राजू नवघरे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी केली. यावर श्री. पवार यांनी जिल्हाधिकारी आणि मदत व पुनर्वसन विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आमदार नवघरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CCTV: अजित पवारांच्या विमान अपघाताचा सीसीटीव्ही आला समोर; प्लेन कोसळलं अन् झाला स्फोट

Baramati Plane Crash : विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले...

Ajit Pawar Death News LIVE Updates: शरद पवार, प्रतिभा पवार बारामतीत दाखल

Ajit Pawar Last Message : मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा, आयुष्य नीट जगा; निधनापूर्वी अजित पवारांनी दिलेला अखेरचा सल्ला

Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघातात निधन झालेली क्रु मेंमर पिंकी माळी कोण?

SCROLL FOR NEXT