वसमत जिल्हा हिंगोली येथे आशांचा मोर्चा 
मराठवाडा

आशा व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने वसमतला मोर्चा

मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. मुगाची बुरुड व राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले यांनी केले.

संजय बर्दापूरे

वसमत ( जिल्हा हिंगोली ) : वसमत कृती समिती नियंत्रक व आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मंगळवारी (ता. २२) रोजी आपल्या विविध मागण्यासाठी मोर्चा काढला. यावेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.

मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कॉ. मुगाची बुरुड व राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले यांनी केले. निवेदनात केलेल्या मागणीनुसार आशांना १८ हजार रुपये मानधन व गटप्रवर्तकांना २१ हजार रुपये मानधन तसेच बीसीएम यांना ३० हजार रुपये मानधन देऊन शासकीय सेवेचा लाभ देण्यात यावा. कोरोना काळातील कामाचा प्रोत्साहनपर भत्ता म्हणून राज्य सरकारने पाचशे रुपये आशा व गटप्रवर्तक यांना द्यावे.

हेही वाचा - नक्की पाहिली पाहिजेत अशी महाराष्ट्रातील १० ठिकाणे

आरोग्य विभागाने कंत्राटी कामाचे सुसूत्रीकरण व वेतन वाढ केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांइतके गटप्रवर्तक यांना मानधन द्यावे, शासन नोकर भरतीमध्ये ग्रामपंचायत, अंगणवाडी, जिल्हा परिषद, नगर परिषद, मनपा आदी ठिकाणी नोकर भरतीत आशा व पाल्यांना जागा राखीव ठेवाव्यात, जननी सुरक्षा योजनेचा लाभ सरसगट देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश निवेदनामध्ये करण्यात आला आहे.

निवेदनावर महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक कृती समिती उपाध्यक्ष काॅ. मुगाजी बुरुड, जिल्हा संघटक पांडुरंग कतुरे, जिल्हा उपाध्यक्ष वैशाली गरड, तालुका अध्यक्ष कदम, शहराध्यक्ष सविता काळे, कल्पना कीर्तने, सीमा बेंडके. सुनिता कांबळे आदींसह तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

मेल-एक्सप्रेस आणि लोकलच्या संख्येत वाढ, प्लॅटफॉर्मचा विस्तार, नवीन 238 ऑटोमॅटिक डोअर गाड्या... प्रवाशांसाठी मोठी घोषणा

Shakambhari Navrtri 2025: शाकांभरी नवरात्र का आहे खास? जाणून घ्या तारीख, पूजा विधी अन् महत्त्व एकाच क्लिकव

Sleep Science Explained: रात्री 8 तासांची पूर्ण झोप की दुपारची डुलकी? काय आहे फायदेशीर, वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT