girl died while shooting reels  
मराठवाडा

छ. संभाजीनगर : रिल्स शूट करताना क्लचऐवजी Accelerator वर पाय; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

girl died while shooting reels : छत्रपती संभाजीनगर येथील हनुमान नगर परिसरात राहणारी श्वेता सुरवसे ही २३ वर्षीय तरुणी तिच्या मित्रासह सुलीभंजन येथील दत्त मंदिरात गेली होती. मात्र....

सकाळ वृत्तसेवा

खुलताबाद : खुलताबादमधील सुलीभंजन येथे रिल्स शूट करणे एका तरुणीच्या जिवावर बेतले. रिल्स शूट करताना क्लच ऐवजी चुकून एक्सलेटवर पाय ठेवल्याने कार थेट दरीत कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील हनुमान नगर परिसरात राहणारी श्वेता सुरवसे ही २३ वर्षीय तरुणी तिच्या मित्रासह सुलीभंजन येथील दत्त मंदिरात गेली होती.

दत्तधाम मंदिर परिसरात मोबाईलवर रिल्स बनविणारया युवतीला आपला प्राण गमवावा लागला. शिवराज संजय मुळे (वय 25) असे तिच्या मित्राचे नाव आहे. सोमवारी दुपारी दत्त मंदिर परिसरात आल्यानंतर श्वेताला रिल्स शूट करण्याचा मोह आवरता आला नाही.

मी कार चालवून बघते, तू व्हिडिओ शूट कर अस तिने मित्राला सांगितले. मात्र, कार चालवत असताना श्वेताच्या हातून रिव्हर्स गिअर पडला. यानंतर तिने क्लच ऐवजी चुकून एक्सलेटरवर पाय ठेवला आणि गाडी थेट दरीत साधारण ५०० फुट खोल कोसळली. तिचा मित्र मदतीला धावला, पण तोवर कार दरीत कोसळली होती. या अपघातात श्वेताचा मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

सुलीभंजन येथील दत्त मंदिराचा परिसर विहंगम असून पावसाळ्यात परिसरातील निसर्ग सौंदर्य आणखी खुलते. त्यामुळे पावसाळा सुरू झाला की पर्यटकांची पावले या भागाकडे वळतात. मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते तर ही घटना घडली नसती असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 2nd ODI : ४१ धावा अन् रोहित शर्मा 'मोठ्या' खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन बसेल, जबरदस्त विक्रम नोंदवण्याची संधी

Nagpur Tiger: सालेघाट जंगलात वाघाचा संशयास्पद मृत्यू; कोणतीही जखम नाही, वनविभागाचा तपास सुरू

Latest Marathi News Live Update :दिल्ली विद्यापीठाच्या दोन महाविद्यालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी

Sinnar Election : मतदान केंद्रावर 'मिरची स्प्रे'चा हल्ला; सिन्नरमध्ये गोंधळ, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार

Vastu Tips For Money: तुमच्याही खिशात पैसे राहत नाहीत का? मग धनवाढीसाठी करा 'हे' खास उपाय

SCROLL FOR NEXT