मराठवाडा

मराठवाड्यात आठही जिल्ह्यांतील 1240 गावांवर जलसंकट

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - भूजल व भूपृष्ठावरील पाणीसाठे झपाट्याने आटत चाललेल्या मराठवाड्याची वाटचाल मार्च महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात टॅंकरवाड्याच्या दिशेने सुरू झाली आहे. आठही जिल्ह्यांतील 1240 गावे 397 वाड्यांना भीषण जलसंकटाचा सामना करावा लागत असून, या गाव-वाड्यांमधील 33 लाख 22 हजारांवर लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. या गाव-वाड्यांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने 1627 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे. 

पावसाचे प्रदीर्घ खंड व सरासरीच्या तुलनेत साठ टक्‍केच पाउस झालेल्या मराठवाड्यात यंदा जलसंकटाने होरपळ वाढविणे सुरू केली आहे. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र आहेत. पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या मराठवाड्यात टंचाई निवारण्यासाठी 2199 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये सुरू असलेल्या 1627 टॅंकरला पाणीपुरवठा करण्यासाठी 762 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याशिवाय टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेल्या 1437 विहिरींचा समावेश आहे. 

जिल्हानिहाय टॅंकरची संख्या 
औरंगाबाद ... 780 
जालना ... 277 
परभणी ... 05 
हिंगोली ... 16 
नांदेड ... 28 
बीड .. 470 
लातूर ... 04 
उस्मानाबाद ... 47 

दृष्टिक्षेपात दुष्काळ 
- 33 लाख 22 हजार लोकांची तहान टॅंकरवर 
- 1627 टॅंकरने पुरविले जाते आहे पिण्याचे पाणी 
- 1240 गावे व 397 वाड्या करताहेत पाणीटंचाईचा सामना 
- टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी 1437 विहिरींचे अधिग्रहण 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: फिलिप सॉल्टची तुफानी फटकेबाजी, दिल्लीविरुद्ध ठोकलं आक्रमक अर्धशतक

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT